शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

हुपरी पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात, कारवाई न करण्यासाठी महिलेकडून घेतली लाच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 12:41 IST

हुपरी : किरकोळ स्वरूपाच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी महिलेकडून ९ हजारांची लाच घेताना हुपरी पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार दिलीप ...

हुपरी : किरकोळ स्वरूपाच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी महिलेकडून ९ हजारांची लाच घेताना हुपरी पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार दिलीप योसेफ तिवडे (वय ५२, रा. ॲपल सरस्वती हॉस्पिटलनजीक, कदमवाडी, कोल्हापूर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई सायंकाळी साडेसहा वाजता महिलेच्या घरातच केली. याप्रकरणी हुपरी पोलिसांत गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.याबाबत समजलेली माहिती अशी, हुपरीतील जुने बसस्थानक चौकानजीक राहणाऱ्या महिलेने कुत्री पाळली आहेत. कुत्र्यांचा रहिवाशांना त्रास होत होता. या कुत्र्यांनी अनेकांचा चावा घेतल्यावरून या महिलेशी अनेकांचा वाद होत असे. त्यामुळे रहिवाशांनी पोलिस ठाण्यात तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. याबाबतचा तपास दिलीप तिवडे याच्याकडे होता. याप्रकरणी कारवाई करू नये यासाठी तिवडेने महिलेकडे १० हजारांची लाच मागितली. नऊ हजारवर तोडगा मान्य झाला. ही रक्कम सोमवारी देण्याचे ठरले होते. दरम्यानच्या कालावधीत महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला होता. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधकचे पोलिस निरिक्षक बापू साळुंखे, संजीव बंबरगीकर व सहकाऱ्यांनी सापळा रचून तिवडे याला या महिलेकडून ९ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून त्याच्यावर अटकेची कारवाई केली.हुपरी पोलिस ठाण्यात अशा पद्धतीच्या यापूर्वी पाच कारवाया झाल्या आहेत. या कारवाईत पोलिस निरीक्षकासह अर्धा डझनहून अधिक पोलिसांवर कारवाई झाल्याचा इतिहास आहे. येथील पोलिसांच्या लाचखोर प्रवृत्तीमुळे हुपरी पोलिस ठाणे बदनाम होण्याबरोबरच जनतेत पोलिसांबाबत प्रचंड रोष निर्माण झाला होता. त्यामुळे सध्याचे तत्कालीन पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना हुपरीत जनता दरबार भरवून जनतेची समजूत काढावी लागली होती. त्यानंतर सोमवारी घडलेल्या तिवडे लाचखोरी प्रकरणाने याला उजाळा मिळत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिस