शहरातील ५० हलगी वादकांना सहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:22 IST2021-05-15T04:22:45+5:302021-05-15T04:22:45+5:30

कोल्हापूर : युवासेना, कोल्हापूर व संस्कार शिदोरी यांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातील ५् गरजू हलगीवादकांना एक महिन्याची मदत देण्यात ...

Assistance to 50 light musicians in the city | शहरातील ५० हलगी वादकांना सहाय्य

शहरातील ५० हलगी वादकांना सहाय्य

कोल्हापूर : युवासेना, कोल्हापूर व संस्कार शिदोरी यांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातील ५् गरजू हलगीवादकांना एक महिन्याची मदत देण्यात आली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून सर्वप्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम बंद आहेत. त्याचा परिणाम हलगी वादनाच्या व्यवसायावर झाला आहे. त्यामुळेच या दोन्ही संघटनांच्यावतीने त्यांना सहाय्य करण्याचा निर्णय घेण्यात आला.

वारे वसाहत, शिवाजी पेठ, राजारामपुरी मातंग वसाहत, मंगळवार पेठ या ठिकाणी त्यांना प्रत्यक्ष मदत देण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख युवासेना मंजीत माने, संस्कार शिदोरीच्या स्मिता खामकर, युवासेनेचे उपशहरप्रमुख शेखर बारटक्के, वैभव जाधव, सनराज शिंदे, विभागप्रमुख रोहित वेढे, शुभम मोरे, तुषार इंगवले, ओंकार रणदिवे, मंथन पायमल उपस्थित होते.

१४०५२०२१ कोल युवा सेना

युवा सेना आणि संस्कार शिदोरी यांच्यावतीने शहरातील हलगीवादकांना एक महिन्याचा शिधा देण्यात आला. यावेळी मंजीत माने, स्मिता खामकर उपस्थित होत्या.

Web Title: Assistance to 50 light musicians in the city