आसमा आज ७२ किलोमीटर तिरंगा घेऊन धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:13 IST2021-02-05T07:13:45+5:302021-02-05T07:13:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कमला काॅलेजची विद्यार्थिनी आसमा अजमल कुरणे ही आज, मंगळवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी सहा वाजता ...

आसमा आज ७२ किलोमीटर तिरंगा घेऊन धावणार
लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : कमला काॅलेजची विद्यार्थिनी आसमा अजमल कुरणे ही आज, मंगळवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी सहा वाजता चौदा तासांच्या आतमध्ये ७२ किलोमीटर अंतर तिरंगा हाती घेऊन धावणार आहे. तिच्या या उपक्रमाची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये होणार आहे.
कमला काॅलेज ते जयसिंगपूर अशी न थांबता ७२ किलोमीटरची धाव घेण्याचा मानस तिने व्यक्त केला आहे. तिच्या हातामधील घड्याळामध्ये असलेल्या जीपीएस सिस्टीममध्ये या रेकाॅर्डची नोंद होणार आहे. एक क्षणही ती थांबली तर हा रेकाॅर्ड पूर्ण होणार नाही. अतिशय अवघड असणारा हा धावण्याच्या प्रकार ती पूर्ण करणार आहे. सात व आठ फेब्रुवारी दरम्यान मुंबईत स्टेडियम रन होणार आहे. सलग बारा तास धावून विश्व अजिंक्यपद व आशियाई ओसेनिया अजिंक्य या जागतिक पातळीवरील स्पर्धेसाठी तिला पात्र व्हायचे आहे. यापूर्वी तिने मुंबईत झालेल्या महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले होते. ती कमला काॅलेजमध्ये अंतिम वर्षामध्ये शिकत आहे. तिला संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य क्रांतीकुमार पाटील, प्राजक्त पाटील, उपाध्यक्ष एस. एन. पवार, प्राचार्या डाॅ. तेजस्विनी मुडेकर आदींचे मार्गदर्शन लाभत आहे.
२५०१२०२१-कोल-आसमा कुरणे-रनिंग