माऊलींची स्वारी थेट ट्रकातून, कोल्हापूरहुन प्रतिपंढरपूर नंदवाळकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 14:07 IST2020-07-01T14:01:23+5:302020-07-01T14:07:32+5:30
कोल्हापूरातील मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदीरातून आषाढी एकादशीनिमित्त निघालेली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी सजविलेल्या ट्रकमधून व मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत नंदवाळ (ता.करवीर) येथील विठ्ठल मंदीरात पोहचली.

कोल्हापूरातील मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदीरातून आषाढी एकादशीनिमित्त निघालेली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी सजविलेल्या ट्रकमधून व मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत नंदवाळ (ता.करवीर) येथील विठ्ठल मंदीरात पोहचली. तत्पुर्वी बुधवारी सकाळी पुईखडी घाटात छायाचित्रकार आदित्य वेल्हाळ यांनी टिपलेले छायाचित्र.
कोल्हापूर : कोल्हापूरातील मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदीरातून आषाढी एकादशीनिमित्त निघालेली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी सजविलेल्या ट्रकमधून व मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत नंदवाळ (ता.करवीर) येथील विठ्ठल मंदीरात पोहचली.
श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळ व जय शिवराय फुटबॉल प्लेयर तरुण मंडळ यांच्या वतीने सलग १७ वर्षे श्री क्षेत्र कोल्हापूर येथून ही आषाढी दिंडी पालखी प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळकडे रवाना होत असते. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंचक्रोशीतील ७० हून अधिक गावातील हजारो वारकऱ्यांचा सहभाग असलेल्या या दिंडी परंपरेत खंड पडू नये यासाठी शासकीय सुचनेनुसार विशेष परवानगी देण्यात आली.
विठ्ठल मंदिर, हिंदू एकता कार्यौलय, मिरजकर तिकटी येथून मान्यवराच्या हस्ते आरती झाल्यावर ही दिंडी सकाळी नऊ वाजता रवाना झाली. विठ्ठल मंदिरात संयोजक अध्यक्ष बाळासो पवार, उपाध्यक्ष दीपक गौड, ऋतुराज क्षीरसागर, वासुदेव संभाजी पाटील, भगवान तिवले, अँड. राजेंद्र कींकर, संतोष कुलकर्णी, राजेंद्र मकोटे, गंगाधरदास महाराज, पुजारी मोहन जोशी आदिच्या उपस्थितीत विठ्ठल आरती करण्यात आली.
आरतीनंतर साजवलेल्या ट्रकमधून शिवाजी पेठ, राधानगरी रोड मार्गे पालखी नंदवाळकडे रवाना झाली. यावेळी वाहनातील वारकरी बंधूनी मास्कचा वापर केला होता. या वेळी सखाराम चव्हाण, भारत चव्हाण, जुना राजवाडा पोलिस स्थानकाचे जाधव, विहीपचे अँड. रणजितसिंह घाटगे, किशोर घाटगे, हभप यादव महाराज, सुरेश जरगसह मान्यवर सहभागी झाले होते. तमाम वारकरी बंधू - भगिनीनी घरीच राहून बहुमुल्य सहकार्य केले बद्दल आवाहन श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळावतीने सगळ्याचे जाहीर आभार मानले आहे.