कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी आशा जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:19 IST2021-04-03T04:19:51+5:302021-04-03T04:19:51+5:30

कोल्हापूर : शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. आशा जाधव, मानद सचिवपदी डॉ. किरण दोशी आणि ...

Asha Jadhav as the President of Kolhapur Medical Association | कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी आशा जाधव

कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी आशा जाधव

कोल्हापूर : शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. आशा जाधव, मानद सचिवपदी डॉ. किरण दोशी आणि खजिनदारपदी डॉ. ए. बी. पाटील यांची निवड करण्यात आली. असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. २०२१/२२ वर्षासाठी या निवडी करण्यात आल्या आहेत.

मावळते अध्यक्ष डॉ. आबासाहेब शिर्के यांनी नूतन अध्यक्ष डॉ. आशा जाधव यांच्याकडे सूत्रे सोपविली. कोरोना काळात संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील डॉक्टरांचे कार्य कौतुकास्पद आहे. दुसरी लाट आली असतानाही कोल्हापुरात कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टरांचे योगदान मोठे आहे. यापुढेही सर्व डॉक्टर्स रुग्णसेवेत कुठेही कमी पडणार नाहीत, अशी ग्वाही नूतन अध्यक्षा डॉ. आशा जाधव यांनी पदभार स्वीकारताना दिली.

इतर कार्यकारिणी सदस्य खालीलप्रमाणे

मावळते अध्यक्ष डॉ. आबासाहेब शिर्के,सल्लागार समिती चेअरमन डॉ. रवींद्र शिंदे, सल्लागार समिती सदस्य डॉ. संदीप साळोखे, उपाध्यक्षा डॉ. गीता पिल्लई, सदस्य डॉ. राजेंद्र वायचळ, डॉ शैलेश कोरे डॉ. नीता नरके, डॉ. अमर अडके, डॉ. शीतल देसाई, डॉ. सुरज पवार, डॉ. अमोल कोडोलीकर,डॉ. विजय हिरानी, डॉ. अरुण धुमाळे, डॉ. सलीम लाड, डॉ. कौस्तुभ वाईकर, डॉ. शीतल पाटील, डॉ. अश्विनी पाटील ,डॉ. राजेंद्र चिंचणीकर डॉ. देवेंद्र जाधव.

०२०४२०२१ कोल डॉ. आशा जाधव

०२०४२०२१ कोल डॉ. किरण दोशी

०२०४२०२१ कोल डॉ. ए. बी. पाटील

Web Title: Asha Jadhav as the President of Kolhapur Medical Association