शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ए.एस. ट्रेडर्सचा संचालक महेश शेवाळे पोलिसांना शरण

By उद्धव गोडसे | Updated: January 20, 2024 18:01 IST

संशयित संचालक आणि एजंट आता स्वत:हून पोलिसांत हजर होऊ लागले

कोल्हापूर : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या ए. एस. ट्रेडर्स कंपनीचा संचालक महेश बळवंत शेवाळे (रा. तिटवडे, पोर्ले तर्फ ठाणे, ता. पन्हाळा) हा स्वत:हून शुक्रवारी (दि. १९) आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, सोमवारपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. त्याच्या मालमत्तांचा शोध सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.कमी कालावधीत मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ए. एस. ट्रेडर्स आणि तिच्या संलग्न कंपन्यांनी गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा सध्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून तपास सुरू आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार लोहितसिंग सुभेदार याच्यासह १४ संशयितांना पोलिसांनी यापूर्वी अटक केली असून, अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात चकरा मारणारे संशयित संचालक आणि एजंट आता स्वत:हून पोलिसांत हजर होऊ लागले आहेत. ए. एस. ट्रेडर्स कंपनीचा संचालक महेश शेवाळे याने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्याला जामीन मंजूर झाला नाही. अखेर शुक्रवारी तो स्वत:हून आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत हजर झाला. पोलिसांसमोर शरण येऊन त्याने तपासात सहकार्य करण्याची कबुली दिली आहे, अशी माहिती तपास अधिकारी कळमकर यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस