शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
4
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
5
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
6
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
7
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
8
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
9
VIDEO : टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना विचारला स्कीन केअर रुटीनसंदर्भातील प्रश्न
10
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
11
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
12
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
13
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
14
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
15
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
16
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
17
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
18
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
19
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
20
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट

मुलांना टॉपला नेण्याची स्पर्धा, त्यात कॉलेजचा पट होतोय अर्धा; करिअरसाठी पालक जागरुक

By समीर देशपांडे | Updated: August 6, 2025 17:23 IST

दर्जेदार शिक्षणासाठी शाळा, कॉलेजनी सज्ज व्हावे

समीर देशपांडेकोल्हापूर : मुलांना इंजिनिअर करायचे आहे, डॉक्टर करायचे आहे. सध्याचा कनिष्ठ महाविद्यालयाचा अभ्यासक्रम या परीक्षांच्या पात्रतेसाठीच्या तयारीला पूरकही आहे. परंतु नियमित अभ्यास आणि प्रचंड सराव घेण्याचा अभाव असल्याने पालकच मुला-मुलींना अकॅडमीमध्ये घालण्याला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, अशी एक साखळीच तयार झाली असून, ‘कनिष्ठ महाविद्यालयात नाव, पण अकॅडमीत धाव’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.पहिली ते पाचवी प्राथमिक, सहावी ते आठवी उच्च प्राथमिक, नववी, दहावी माध्यमिक आणि ११ वी ते १२ उच्च माध्यमिक, अशी त्रिस्तरीय शिक्षण पद्धती आपल्याकडे सध्या कार्यरत आहे. परंतू एकदा का चौथी इयत्ता झाली की पालकांना अकॅडमीचे वेध लागायला सुरुवात होते. सैनिक शाळा, नवोदय, एनएमएमएस, विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती परीक्षा, अकॅडमीतील इतर उपक्रम पालकांना भुरळ घालतात. त्याठिकाणी मजबूत शुल्क आकारले जात असल्याने साहजिकच शिक्षकही त्याच पद्धतीने मुलांकडून अभ्यास करवून घेतात. यामुळे ग्रामीण भागामध्ये अधिकाधिक मुलामुलींना अकॅडमीमध्ये घालणाऱ्या पालकांची संख्या वाढू लागली आहे.अकरावी, बारावीला तर वेगळाच पॅटर्न आता गेल्या दहा वर्षांत रूढ झाला आहे. आता इंजिनिअरिंगसाठी जीई आणि मेडिकलसाठी नीट परीक्षा सक्तीची आहे. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पूर्वपरीक्षांसाठीही आता स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा असल्यामुळे मुलांची या परीक्षांची तयारी व्हावी यासाठी खासगी अकॅडमीमध्ये मुला-मुलींना घातले जाते. त्यासाठी वार्षिक फी सव्वा लाखापासून दोन लाख रुपयांपर्यंत देण्यासही पालक मागेपुढे पाहत नाहीत. याचवेळी त्यांचे नाव मात्र शासनमान्य शिक्षण संस्थेच्या ११ आणि १२ वीच्या वर्गात घातलेले असते. परीक्षेलाही तो त्याच महाविद्यालयातून बसतो.

विद्यार्थी अकॅडमीत गर्कस्पर्धा परीक्षांसाठी परीक्षेचे तंत्र आणि नियमित सराव आवश्यक असल्याने पारंपरिक अकरावी, बारावी शिकवणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये यासाठी मर्यादा आहेत. याउलट भरभक्कम शुल्कामुळे अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीवर बसून त्यांच्याकडून नियमित सराव करून घेण्यात येतो. याच बलस्थानाच्या जोरावर कनिष्ठ महाविद्यालयांत रिकामे वर्ग आणि अकॅडमीमध्ये विद्यार्थी गर्क’ अशी स्थिती आहे.

नोंदणी नाही, मान्यताही नाहीअनेक अकॅडमींची नेमकी नोंदणी होत नाही. तर ती सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाच्या कोणत्याही परवानगीचीही गरज भासत नाही. त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे जंगलात पत्र्याच्या शेडमध्ये सुरू केलेल्या अकॅडमींच्याही आता टोलेजंग इमारती झाल्या आहेत.

जिल्ह्यातील आकडेवारी

  • माध्यमिक शाळा - १,०६९
  • उच्च माध्यमिक शाळा - ३२८
  • शिक्षक संख्या - १३, ६३९
  • शिक्षकेतर कर्मचारी - ५,४७३
  • मुले - १,९५,०३१
  • मुली - १,६१,२३६
  • एकूण - ३, ५६,२६७

कनिष्ठ महाविद्यालयात अनेकदा तास वेळेवर होत नाहीत आणि दर्जेदार अध्यापन होत नाही. त्यामुळे मुले येत नाहीत. मुलांचा मौल्यवान वेळ वाया जातो. याउलट जरी फी घेतली तरी अकॅडमीमध्ये मुलांकडून अभ्यास करवून घेतला जातो. जो त्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी मोलाचा ठरतो. -एम. बी. सूर्यवंशी, कोल्हापूर, पालक