शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
2
"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
3
परभणीत खासदार संजय जाधव अन् मतदान निरीक्षकांत वाद; दोन प्रभागांतील उमेदवारांतही बाचाबाची
4
IMF चं कर्ज फेडायचंय, पैसे द्या; सैन्यासमोर मुस्लीम देशाने पसरले हात; भारताकडेही मागितली मदत
5
शाई पुसून पुन्हा मतदान शक्य नाही, कारण...; मार्कर पेन वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
6
Retail Therapy: नियमितपणे शॉपिंगला जाणाऱ्या महिला दीर्घायुष्य जगतात, संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
7
Municipal Corporation Election 2026 LIVE Updates: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४१.०८ टक्के मतदान; पहा कुठे किती मतदान झाले?
8
सावधान! तुमच्या 'या' ५ चुकांमुळे स्मार्टफोन लवकर होऊ शकतो खराब; आजच बदला आपल्या सवयी
9
'ट्रम्प' धोरणांचा दुहेरी फटका! व्हिसा स्टॅम्पिंगमध्ये होणाऱ्या विलंबामुळे भारतीयांना नोकऱ्या जाण्याची भीती
10
स्थानिक निवडणुकांमध्ये कधीपासून मार्करचा वापर होतोय? वादानंतर निवडणूक आयुक्तांचं स्पष्टीकरण, म्हणाले...
11
"हे बोगस मतदानासाठी तर नाही ना", व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळेंनी संपूर्ण प्रक्रियेवर उपस्थित केली शंका
12
रशियाच्या रडारवर दोन युरोपियन देश; पुतीन यांच्या डोळ्यात का खुपत आहेत ब्रिटन आणि जर्मनी?
13
धुळे महापालिका निवडणूक: प्रभाग १८ मध्ये राडा, EVM ची तोडफोड, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
14
I-PAC Raid Case: सर्वोच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जींना दणका; आय-पॅक प्रकरणात धाडली नोटीस!
15
ही कसली लोकशाही? निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा; उद्धव ठाकरे कडाडले
16
BSNL चा 'महाधमाका'! हाय-स्पीड WiFi प्लॅनवर २०% सवलत; ५००० GB डेटासोबत OTT देखील मोफत!
17
संसार मोडला अन् आयुष्यही संपवलं! पत्नी ४ मुलांसह गायब; संतापलेल्या पतीने सासरच्या दारातच स्वतःला पेटवले
18
'या' महाराणीनं भारत-चीन युद्धात देशासाठी दान केलेलं ६०० किलो सोनं, खासगी विमानं, विमानतळ; घराण्याकडे होती अफाट संपत्ती
19
"मला राजकारण कळत नाही, वरचे निर्णय घेतात', मतदानाच्या दिवशीच सुभाष देशमुखांचा भाजपाला घरचा आहेर
20
IND vs PAK T20 World Cup: तिकीट बुकिंगसाठी चाहत्यांची ऑनलाईन गर्दी; वेबसाइटच झाली क्रॅश; अन्...
Daily Top 2Weekly Top 5

किती ही बेरोजगारी... पोलिसांच्या ८८ जागांसाठी कोल्हापुरात तब्बल सात हजार अर्ज

By उद्धव गोडसे | Updated: January 15, 2026 11:34 IST

निवडीसाठी कस लागणार : सरासरी एका जागेसाठी ७९ उमेदवारांमध्ये होणार रस्सीखेच

उद्धव गोडसेकोल्हापूर : जिल्हा पोलिस दलात रिक्त असलेल्या ८८ जागांसाठी तब्बल सात हजार उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून अर्जांची माहिती जिल्हा पोलिस दलास प्राप्त झाली. मोठ्या संख्येने अर्ज आल्याने एका जागेसाठी ७९ उमेदवारांमध्ये स्पर्धा असेल. स्पर्धेमुळे निवड प्रक्रियेत उमेदवारांचा कस लागणार आहे. लवकरच शारीरिक चाचणीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.राज्यात १५ हजार ३०० पोलिसांची पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोल्हापूर पोलिस दलात रिक्त असलेल्या ८८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी ७ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत होती. ८८ जागांसाठी तब्बल सात हजार अर्ज आले आहेत. महासंचालक कार्यालयाकडून अर्जांची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयास प्राप्त झाली. मोठ्या संख्येने अर्ज आल्यामुळे एका जागेसाठी सुमारे ७९ उमेदवारांमध्ये स्पर्धा असेल.यातून स्वत:ला सिद्ध करून खाकी वर्दी अंगावर चढविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उमेदवारांचा कस लागणार आहे. भारत राखीव बटालियनमध्ये ३१ जागांसाठी भरतीप्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी आलेल्या अर्जांची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. शारीरिक चाचणीसाठी मैदाने सज्ज करण्याचे काम पोलिस प्रशासनाकडून सुरू आहे.

शारीरिक चाचणीत लागणार कसशारीरिक चाचणीत पात्र झालेल्या उमेदवारांना उपलब्ध जागांच्या एकास दहा या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी बोलवले जाईल. लेखी परीक्षेला पात्र ठरण्यासाठी उमेदवारांना शारीरिक चाचणीत कौशल्य पणाला लावावे लागणार आहे. ५० गुणांच्या शारीरिक चाचणीत पुरुषांसाठी १६०० मीटर, १०० मीटर धावणे आणि गोळाफेक चाचणी घेतली जाईल. महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर, १०० मीटर धावणे आणि गोळाफेक चाचणी घेतली जाईल.

लेखीही तितकीच महत्त्वाचीशारीरिक चाचणीत पात्र झालेल्या उमेदवारांना १०० गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागेल. यात अंकगणित, सामान्यज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता, व्याकरण आणि वाहतूक नियमांवर आधारित प्रश्न असतील. शारीरिक चाचणीसह लेखी परीक्षेतही उत्तम गुण मिळवणारे उमेदवार निवड यादीत झळकतात. त्यामुळे उमेदवारांना लेखी परीक्षेचीही जोरदार तयारी करावी लागणार आहे.

उमेदवारांचे फेस रीडिंगभरतीप्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून उमेदवारांचे फेस रीडिंग केले जाईल. धावण्याच्या चाचणीतील अचूक नोंदींसाठी टॅगिंग सिस्टिमचा वापर केला जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली लेखी परीक्षा होईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : High Unemployment: 7,000 Applications Received for 88 Police Constable Posts

Web Summary : Kolhapur police received 7,000 applications for 88 constable posts, highlighting high unemployment. Intense competition requires candidates to excel in physical and written tests. Face reading and tagging systems will ensure transparency during recruitment.