शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सगळ्यांनी ठरवलंय म्हणून सरकार आलं, जितेंद्र आव्हाडांचा संजय राऊतांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 15:06 IST

जातीय कीड लागून राज्य पोखरले जाऊ नये व धर्मांध शक्तीला बाजूला ठेवण्यासाठी आमचं तिघांचं ठरलंय आणि हे सगळे शरद पवार यांच्यामुळे घडले, हेही विसरता येणार नाही.

कोल्हापूर : आपआपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवण्यासाठी बोलावे लागते. तरीही कोणी एकाने ठरवलंय म्हणून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले नाही, सगळ्यांनी ठरवले म्हणून आले. जातीय कीड लागून राज्य पोखरले जाऊ नये व धर्मांध शक्तीला बाजूला ठेवण्यासाठी आमचं तिघांचं ठरलंय आणि हे सगळे शरद पवार यांच्यामुळे घडले, हेही विसरता येणार नसल्याचा पलटवार राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर केला.मंत्री आव्हाड रविवारी कोल्हापुरात आले असता, शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. मंत्री आव्हाड म्हणाले, ‘‘देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली, महागाईचा आगडोंब उडाला असताना त्यावर कोणीच बोलत नाही. मशिदीखाली मंदिर सापडले आणि मंदिराखाली मशीद सापडली, असे मुद्दामहून दगडावर दगडे घासून वणवा पेटवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष विचलित करून लोक बेधुंद अस्वस्थेत ठेवण्याचा प्रकार असून, रोज धर्माची पुडी सोडली जात आहे. आर्यन खानबाबत जे घडले त्याच्या मनात तपास यंत्रणेविषयी काय मत तयार झाले असेल, हेही जाणून घेतले पाहिजे.’’ यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार राजीव आवळे आदी उपस्थित होते.

रामनाम म्हणण्याची वेळ आणू देऊ नकामहाराष्ट्राच्या राजकारणात धर्मांध शक्तीला रोखू शकणारे शरद पवार हे एकमेव नेते असल्यानेच त्यांच्यावर सातत्याने विरोधकांकडून हल्ले होत आहेत. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना जशाच तसे उत्तर दिले पाहिजे, असे आवाहन करत आम्ही राम म्हणू , पण आम्हाला रामनाम म्हणण्याची वेळ आणू देऊ नका, असा टोला मंत्री आव्हाड यांनी राज ठाकरे यांना लगावला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJitendra Awhadजितेंद्र आव्हाडSanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडी