अरुण नरके, चेतन नरके यांनी घेतली निपूण कोरेंची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:16 IST2021-07-04T04:16:57+5:302021-07-04T04:16:57+5:30
वारणानगर : गोकूळचे माजी अध्यक्ष अरुण नरके, नूतन संचालक चेतन नरके यांनी वारणानगर येथे श्री वारणा बँकेचे अध्यक्ष ...

अरुण नरके, चेतन नरके यांनी घेतली निपूण कोरेंची भेट
वारणानगर : गोकूळचे माजी अध्यक्ष अरुण नरके, नूतन संचालक चेतन नरके यांनी वारणानगर येथे श्री वारणा बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे यांची भेट घेऊन सहकार क्षेत्रावर चर्चा केली. यावेळी विश्वेश कोरे उपस्थित होते.
वारणा सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात ज्येष्ठ नेते अरुण नरके, चेतन नरके यांचे स्वागत अध्यक्ष निपुण कोरे यांनी केले. यावेळी त्यांच्यात गोकूळ, दुग्ध व्यवसाय, बँकिंग क्षेत्रासह सहकारावर चर्चा झाली. यावेळी गोकूळच्या संचालकपदी निवड झालेबद्दल चेतन नरके यांचा सत्कारही बँकेमार्फत करण्यात आला. युवा नेते विश्वेश कोरे यांनीही चेतन नरके यांचे अभिनंदन केले.
...
फोटो ०३ नरके कोरे भेट
वारणानगर येथे गोकूळचे नूतन संचालक चेतन नरके यांचा सत्कार वारणा बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे यांनी केला. त्यावेळी गोकूळचे माजी अध्यक्ष अरुण नरके, युवा नेते विश्वेश कोरे उपस्थित होते.