शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
4
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
5
"एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
6
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
7
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
8
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
9
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
10
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
11
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
12
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
13
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
14
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
15
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
16
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
17
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
18
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
19
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
Daily Top 2Weekly Top 5

आरळेत (ता. पन्हाळा) सशस्त्र दरोडा

By admin | Updated: October 17, 2014 23:36 IST

दाम्पत्य जखमी : बोरपाडळेत प्रयत्न; पाऊण लाखाचा ऐवज लंपास

देवाळे : आरळे (ता. पन्हाळा) येथे पंडित यशवंत गायकवाड यांच्या घरावर काल, गुरुवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकून रोख रकमेसह सुमारे पाऊण लाखाचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला. पंडित गायकवाड (वय ३८) हे दरोडेखोरांना प्रतिकार करताना झटापटीत डोक्याला चाकू लागल्याने ते गंभीर जखमी झाले, तर पत्नी रेखा गायकवाड या किरकोळ जखमी झाल्या. या घटनेमुळे आरळे, बोरपाडळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. यात एक दरोडेखोरही गंभीर जखमी झाल्याचे पंडित गायकवाड यांनी सांगितले. गायकवाड यांचे घर आरळेच्या दक्षिणेला गावाच्या बाहेर असल्याने दरोडेखोरांनी फायदा घेतला. दरम्यान, आरळे येथीलच दीपक दशरथ जमदाडे यांची घरासमोर लावलेली सीडी डिलक्स (एमएच ०९ एएक्स १९८७) दरोडेखोरांनी लंपास केली. घटनास्थळ व पोलिसांतून समजलेली अधिक माहिती अशी- गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास आरळे येथील पंडित गायकवाड यांच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकून त्यांची पत्नी रेखा यांचे मणिमंगळसूत्र, नथ, पैंजण, पाटल्या, जोडवी आणि रोख रक्कम असा सुमारे पाऊण लाखाचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला. दरोडेखोर आणि पंडित गायकवाड यांच्यात सुमारे २० ते २५ मिनिटे झटापट सुरू होती. यात गायकवाड यांच्या डोक्याला व पोटावर गंभीर जखम झाल्याने ते जमिनीवर कोसळले. याचा फायदा घेत बाहेर थांबलेल्या दरोडेखोरांनी घरावर दगड मारले व पुढील दरवाजा निकामी केला. बोरपाडळे (ता. पन्हाळा) येथील आरळे-बोरपाडळे मार्गावरील विलास शंकर निकम या माजी सैनिकाच्या घराचा मागील दरवाजा काल, गुरुवारी मध्यरात्री एकच्या दरम्यान दरोडेखोरांनी कापण्याचा प्रयत्न केला. यावेळी बॅटरीचा प्रकाश आणि आवाज यामुळे निकम व त्यांची पत्नी जागे झाले. त्यांनी पुढील दरवाजा उघडून दरोडेखोरांचा पाठलाग केला; परंतु ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. तेथे पाना व इतर साहित्य पडलेले आहे. निकम यांच्या शेजारील सोमनाथ तेली यांच्या अ‍ॅपे रिक्षातील साहित्यही उचकटून टाकले होते. आरळे-बोरपाडळे मार्गावरीलच जाधव वस्तीवरील बाहेरच्या सोप्यावरील दोन मोबाईलही याच रात्री चोरीला गेले आहेत. या संपूर्ण प्रकाराने बोरपाडळे, आरळे, देवाळे शहापूर परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. यामुळे कोडोली पोलिसांचे गस्ती पथक असते कुठे, अशी चर्चा लोक करत आहेत. आरळे येथील चोरीची घटना घडल्यानंतर कोडोली पोलिसांना ताबडतोब कळविले असतानाही पोलीस पहाटे पाचच्या सुमारास दाखल झाले. या घटनेची नोंद कोडोली पोलिसांत झाली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट करीत आहेत. (वार्ताहर)मुलांनी दरोडेखोरांना दिले पाणी..गायकवाड दाम्पत्यासोबत अनिकेत या सहावीत शिकणाऱ्या मुलानेही दरोडेखोरांना जोरदार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एक दरोडेखोर म्हणाला की, ‘तुझ्या पप्पा, मम्मीला मारत नाही. आतून पिण्यासाठी पाणी आण’. त्याने रडत रडत दरोडेखोरांना पाणी दिले; परंतु दरोडेखोराने पाणी पिऊन आपला गुण दाखवत अनिकेतवर तोच तांब्या भिरकावला. या संपूर्ण प्रकाराने बोरपाडळे, आरळे, देवाळे शहापूर परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. ४ आरळे येथील दीपक दशरथ जमदाडे यांची मोटारसायकल दरोडेखोरांनी लंपास केली