शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सीताफळांची आवक वाढली, पिवळ्याधमक पपईंनीही फुलला बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 13:47 IST

vegetable Fruits bajar kolhapur : बाजारात यंदा सीताफळांची लवकरच एंट्री झाली आहे. आवक कमी असल्याने दर तेजीत आहेत. घाऊक बाजारात १८०० रुपये डझनापर्यंत दर पोहोचला आहे. त्याचबरोबर पिवळ्याधमक पपईने बाजार फुलला आहे. भाजीपाला मार्केटमध्ये आवक चांगली असल्याने दरात काहीशी घसरण झाली आहे.

ठळक मुद्देसीताफळांची आवक वाढली, पिवळ्याधमक पपईंनीही फुलला बाजार भाजीपाल्याच्या दरात घसरण

कोल्हापूर : बाजारात यंदा सीताफळांची लवकरच एंट्री झाली आहे. आवक कमी असल्याने दर तेजीत आहेत. घाऊक बाजारात १८०० रुपये डझनापर्यंत दर पोहोचला आहे. त्याचबरोबर पिवळ्याधमक पपईने बाजार फुलला आहे. भाजीपाला मार्केटमध्ये आवक चांगली असल्याने दरात काहीशी घसरण झाली आहे.फळबाजारामध्ये पेरू, तोतापुरी आंबा, ड्रॅगन फळ, खजूर, डाळींब, सफरचंद, अननसाची रेलचेल सुरू आहे. सीताफळाची आवकही सुरू असून रविवारी बाजार समितीत सीताफळाचे ३९० ढीग होते. साधारणत: प्रतवारीनुसार २०० ते १८०० रुपये ढीग असा दर आहे. एका ढिगात एक डझन सीताफळे असतात.

भाजीपाला बाजारामध्ये भाज्यांची आवक वाढली आहे. पावसाने उघडीप दिल्याने आवक चांगली असली तरी दरात घसरण होऊ लागली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोबी, वांगी, ओली मिरची, ढब्बू, गवार, कारली, भेंडी, वरणा, वालच्या दरात घसरण झाली आहे.

वाटाण्याची आवकही चांगली आहे; त्यामुळे घाऊक बाजारात ७० रुपये किलो, तर किरकोळ बाजारात १०० रुपये किलोपर्यंत दर आहे. टोमॅटो, घेवडा, दोडका, बिनीस, फ्लॉवरच्या दरात तुलनेत थोडी वाढ झालेली दिसते. कोथिंबिरीची आवक वाढली आहे.

बाजार समितीत रोज ४० हजार पेंढ्यांची आवक होत असल्याने तेवढा उठाव होत नाही. परिणामी घाऊक बाजारात शेकडा ६०० रुपये दर राहिला आहे. मक्याच्या कणसांची आवक वाढली असून ६०० रुपये शेकडा दर आहे, मात्र किरकोळ बाजारात कणसाचा दर दहा रुपये आहे.पालेभाज्यांची आवक स्थिर आहे. कांदापात दहा रुपये, तर मेथी पंधरा रुपये पेंढी आहे. पालक, पोकळा मात्र सात रुपयांवर स्थिर राहिला आहे. महाराष्ट्रीय बेंदूर तोंडावर आल्याने सरकी तेलाच्या दरात पुन्हा हळूहळू वाढ होऊ लागली आहे. सध्या १५० रुपये किलो असले तरी घाऊक बाजारात मात्र किलोमागे तीन-चार रुपयांची वाढ दिसते. डाळींसह साखर, रवा, आटा, मैद्याचे दर स्थिर आहेत.किरकोळ बाजारातील दर प्रतिकिलो असे -तूरडाळ - ११०, हरभराडाळ - ७०, मूगडाळ - ११०, मूग -१००, शाबू - ६०, साखर - ३५, रवा - ३५, आटा - ३०, मैदा - ३०, खोबरे - १८०. 

टॅग्स :vegetableभाज्याfruitsफळेMarketबाजारkolhapurकोल्हापूर