अत्याचारप्रकरणी पतीसह दिरास अटक : रूईकर कॉलनीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:44 IST2018-03-03T00:44:19+5:302018-03-03T00:44:19+5:30

 Arrested for raping her husband | अत्याचारप्रकरणी पतीसह दिरास अटक : रूईकर कॉलनीतील प्रकार

अत्याचारप्रकरणी पतीसह दिरास अटक : रूईकर कॉलनीतील प्रकार

ठळक मुद्देविवाहितेस ठार मारण्याचीही धमकीशेजाºयांनी दिला पीडितेला आधार

कोल्हापूर : रुईकर कॉलनीत राहणाºया विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी गुरुवारी पतीसह दिराला अटक केली. संशयित पती अली अकबर झाकीर हुसेन आगा (वय २६), दीर रमजान झाकीर हुसेन आगा (२४) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
अधिक माहिती अशी, पीडित महिला एकटी घरी असताना तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत दीर रमजान याने वारंवार अत्याचार केला. या अत्याचाराविरुद्ध आवाज न उठविता पतीने भावाला साथ देत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला तसेच भावाच्या गैरकृत्यास प्रोत्साहन मिळेल असे कृत्य केले. या प्रकाराची कुठे वाच्चता केल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याने विवाहितेने शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली.


शेजाºयांनी दिला पीडितेला आधार
पीडित विवाहिता अनाथ आहे. एका डॉक्टर दाम्पत्याने तिचा सांभाळ करून तिला पुणे येथे तिसरीपर्यंत शिक्षण दिले. त्यानंतर तिच्या चुलत्यांचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यात दिले. तिघा चुलत्यांनी मुंबई, पुणे येथे अनाथाश्रमात ठेवले. कोल्हापुरात तिचे अली आगा याच्याशी लग्न झाले. तिला चार वर्षांचा मुलगा आहे. अली हा सतत मारहाण करत असे तसेच दीर रमजान आगा हा तिच्यावर अत्याचार करत असे. रूईकर कॉलनीत राहणारे कुणाल बुलबुले त्यांची पत्नी जान्हवी, शाम नायर, सुशांत टकलगे यांनी या पीडित विवाहितेला आधार दिला.

Web Title:  Arrested for raping her husband