फसवणूकप्रकरणी मुकादमाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:47 AM2021-03-04T04:47:32+5:302021-03-04T04:47:32+5:30

जयसिंगपूर : ऊस तोडणीसाठी टोळी देतो असे सांगून ६ लाख १४ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गेल्या वर्षभरापासून फरार संशयित ...

Arrested in fraud case | फसवणूकप्रकरणी मुकादमाला अटक

फसवणूकप्रकरणी मुकादमाला अटक

Next

जयसिंगपूर : ऊस तोडणीसाठी टोळी देतो असे सांगून ६ लाख १४ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गेल्या वर्षभरापासून फरार संशयित मुकादमाला जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली. सौरभ भरत कांबळे (वय २३, रा. सरकारी दवाखान्याजवळ नंदेश्वर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर), असे संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, गतवर्षी मुकादम कांबळे याने राजेंद्र रामा नेर्लेकर (वय ३९, बावन्न झोपडपट्टी शाहूनगर, जयसिंगपूर) याला ऊस तोडणीकरिता मजूर पुरवठा करतो असे सांगून करार केला होता. यावेळी त्याच्याकडून ६ लाख १४ हजार रुपये रोख रक्कम घेतली होती. त्यानंतर ही रक्कम घेऊन तो फरार झाला होता. याबाबतची तक्रार नेर्लेकर यांनी पोलिसांत दिली होती. मंगळवारी त्याला नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथे सापळा रचून पोलिसांनी पकडले. संशयिताला गुरुवारी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Web Title: Arrested in fraud case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.