शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: मिरजेत गँगवॉर, हत्यारांसह कुख्यात टोळी पकडली शिरोलीतील हॉटेलात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 19:18 IST

२२ लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : मिरजेतील सराईत गुन्हेगार रोहन कलकुटकी याच्यावर गोळीबार करून पळालेला कुख्यात गुन्हेगार सूरज चंदू कोरे (वय २५, रा. मिरज) हा त्याच्या टोळीसह शिरोली एमआयडीसी परिसरातील हॉटेलमध्ये लपला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बुधवारी (दि. २५) मध्यरात्री छापा टाकून कोरे याच्यासह त्याच्या पाच मित्रांना अटक केली. त्यांच्याकडून गावठी बनावटीचे एक पिस्तूल, दोन काडतुसे, तीन सुरे, नऊ मोबाइल आणि अलिशान कार असा २२ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.सूरज कोरे याच्यासह प्रथमेश सुरेश ढेरे (२५), विशाल बाजीराव शिरोळे (२४), पवनसिंग संजयसिंग राजपूत (२७), सर्फराज बाळासो सय्यद (२३) आणि अफताब आयुब काझी (२४, सर्व रा. मंगळवार पेठ, मिरज, जि. सांगली) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमलदार वैभव पाटील यांना मिरजेतील कुख्यात गुन्हेगार सूरज कोरे हा त्याच्या टोळीसह शिरोली एमआयडीसी परिसरातील एका हॉटेलमध्ये लपल्याची टीप मिळाली होती. या टोळीकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे कारवाईदरम्यान प्रत्युत्तर होण्याचा धोका लक्षात घेऊन पोलिसांनी दोन पथके तयार केली. मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलमध्ये छापा टाकून झोपेत असलेल्या आरोपींना उठवून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे एक पिस्तूल, एक हजार रुपयांची दोन काडतुसे, ५०० रुपयांचे तीन धारदार सुरे, १ लाख ७० हजारांचे ९ मोबाइल आणि २० लाखांची कार असा २२ लाख २१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत रवानगी केली. पुढील तपासासाठी त्यांचा ताबा शिरोली एमआयडीसी पोलिसांकडे देण्यात आला. उपनिरीक्षक संतोष गळवे, शेष मोरे यांच्यासह अंमलदार वैभव पाटील, विलास किरोळकर, अमित मर्दाने, अनिकेत मोरे, सत्यजित तानुगडे, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.टोळीची मिरजेत दहशतसूरज कोरे आणि त्याच्या टोळीची मिरजेत दहशत आहे. त्यांच्यावर मारामारी, दमदाटी, अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत. रोहन कलकुटकी याच्यावर १८ जूनला भरदिवसा गोळीबार करून कोरे पळाला होता. बुधवारी ही टोळी शिरोली एमआयडीसी येथील हॉटेलमध्ये पोहोचली होती. त्यांच्या अटकेने मिरज पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.