शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बनावट क्रीडा प्रमाणपत्रप्रकरणी तत्कालीन क्रीडा उपसंचालक व क्रीडा मार्गदर्शक यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 11:12 IST

moscexam, kolhapur, Sangli, crimenews महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी बनावट क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी न करता ते योग्य असल्याचा चुकीचा निर्वाळा दिल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी सांगलीचे तत्कालीन क्रीडा उपसंचालक व क्रीडा मार्गदर्शक अशा दोघांना सोमवारी अटक केली.

ठळक मुद्देअटक केलेल्यांची संख्या पाचवर पोहोचली पोलीस उपनिरीक्षक पदासाठी सादर केले होते प्रमाणपत्र

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी बनावट क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी न करता ते योग्य असल्याचा चुकीचा निर्वाळा दिल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी सांगलीचे तत्कालीन क्रीडा उपसंचालक व क्रीडा मार्गदर्शक अशा दोघांना सोमवारी अटक केली.

अनिल मारुतीराव चोरमले (वय ५४, रा. पीयूष व्हिला अपार्टमेंट, कात्रज डेअरी शेजारी, धनकवडी, पुणे) असे क्रीडा उपसंचालकाचे, तर प्रशांत जिवाजीराव पवार (५३, रा. गुलमोहर कॉलनी, अमित अपार्टमेंट, सांगली) क्रीडा मार्गदर्शक अशी संशयितांची नावे आहेत. त्यामुळे अटक केलेल्यांची संख्या पाचवर पोहोचली आहे.गेल्याच महिन्यात याप्रकरणी जिम्नॅस्टिक असोसिएशनचा सांगली जिल्हाध्यक्ष दीपक बाबासाहेब सावंत (रा. मिरज), संघटनेचा राज्य सेक्रेटरी महेंद्र आनंद चेंबूरकर (वय ६२, रा. मुंबई) व खेळाडू विजय सदाशिव बोरकर (रा. शंभर फुटी रोड, सांगली) या तिघांना अटक केली होती.

उपनिरीक्षक पदाच्या मुलाखतीवेळी क्रीडा स्पर्धेतील बनावट प्रमाणपत्र जोडल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी ही कारवाई केली. उपसंचालक क्रीडा व युवक सेवा संचालनालय कोल्हापूर विभागाचे क्रीडा अधिकारी शंकर भास्करे (रा. सांगली) यांनी चौकशीअंती फिर्याद दिली होती.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत २०१६ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या मुलाखतीवेळी बोरकरने जोडलेल्या प्रमाणपत्राबद्दल अधिकाऱ्यांना शंका आली. त्याची भास्करे यांनी चौकशी केली. त्यांनी ८ जूनला कोल्हापुरात जुना राजवाडा पोलिसांत तिघांविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार बोरकर, सावंत व चेंबूूरकर या तिघांना अटक झाली होती.दरम्यान, हे प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठवले असता, त्यावेळचे सांगली-कोल्हापूरचे क्रीडा उपसंचालक चोरमले यांनी ते योग्य असल्याचा चुकीचा निर्वाळा दिला होता, त्याला प्रशांत पवार यानेही साथ दिली. त्यामुळे सोमवारी या दोघांवर अटकेची कारवाई केली. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरSangliसांगली