शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

Kolhapur: मेकर ग्रुप फसवणूकीतील आरोपींना १६ जानेवारीपर्यंत अटक करा, उच्च न्यायालयाचे आदेश 

By विश्वास पाटील | Updated: January 2, 2024 17:11 IST

तपासातील दिरंगाई गंभीर असल्याचे ताशेरे 

कोल्हापूर : मेकर ग्रुप गुंतवणूकदार घोटाळ्याच्या गुन्ह्यात तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यानी दाखवलेली दिरंगाई ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने मंगळवारी नोंदवले. गुन्ह्यात फरार गुन्हेगारांना १६ जानेवारीपर्यंत अटक  करण्याचे आदेश जिल्हा पोलिस प्रमुख यांना दिले. तपासात कसूर करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यातील आरोपी भास्कर लिमकर याच्या जामीन अर्जावर सुनावणीच्या वेळी न्या. जी. ए. सानप यांनी हे आदेश दिले. सर्वसामान्य गुंतवणूकदार ज्यांची या प्रकरणी फसवणूक झाली ते मात्र न्यायासाठी रडत असल्याचे गंभीर निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले आहे.   पश्चिम महाराष्ट्रात १०० कोटीचा गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या या प्रकरणी डिसेंबर २०१८ मध्ये संजय दुर्गे यांनी फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल केली. त्याचबरोबर इतर गुंतवणूकदारांनी कंपनीची मालमत्ता जप्त करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली त्यामध्ये सुमारे ११ कोटीची मालमत्ता जप्त झाली. तशी अधिसूचना शासनाने काढली. परंतु २-३ आरोपी वगळता मुख्य आरोपी रमेश वळसे पाटील व अंबुलकर यांना अटक झाली नाही. एकूण १८ आरोपी या प्रकरणी आहेत. परंतु उच्च न्यायालयाने आदेश दिल्याने कोल्हापूर जिल्हा आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेने तत्काळ मुख्य आरोपीला अटक केली. या प्रकरणी उच्च न्यायालयाने पोलिसांच्या या प्रकरणी तपासाच्या कासव गतीवर गंभीर ताशेरे ओढले.  जिल्हा पोलिस प्रमुख यांना विशेष पोलिस पथक तयार करून तपास अधिकाऱ्याला मदतीला देण्याचेही आदेश दिले. १६ जानेवारी पर्यन्त सर्व आरोपीना या प्रकरणी अटक करण्याची कारवाई करण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत व जिल्हा पोलिस  प्रमुख कोल्हापूर तसेच तपासी अधिकारी यांना सर्व आरोपीन अटक करून आदेशाची अंमलबजावणी केल्याचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी आदेशाची प्रत विशेष पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर यांना पाठवून योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जर पोलिसानी या आदेशाची अंमलबजावणी करण्यात कसूर केल्यास गांभीर्याने न्यायालय दाखल घेईल असे सुद्धा आदेशात नमूद केले आहे. प्रकरणी पुढील सुनावणी १६ जानेवारीला होणार आहे. 

खरंतर या प्रकरणी गुंतवणूकदारांनी डिसेंबर २०१८ मध्येच फिर्याद दाखल केली आहे. परंतु फक्त जुजबी कारवाई झाली होती. परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशाने दोषीना अटक केली आहे. मालमत्ता सुद्धा जप्त झाल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सर्व आरोपीना अटक करून त्यांच्या मालमत्ता सुद्धा जप्त कराव्यात जेणेकरून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळतील. फिर्यादीतर्फे या प्रकरणी लवकरच हस्तक्षेप अर्ज दाखल करून वस्तुस्थिती उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. - अॅड. धैर्यशील सुतार, वकील, उच्च न्यायालय मुंबई

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीhighwayमहामार्गPoliceपोलिस