शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

लष्कराची बस नदीत काेसळून ७ जवानांचा मृत्यू; गडहिंग्लजवर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 12:00 IST

लडाखमधील तुरतुक सेक्टरमधील दुर्दैवी घटना

लाेकमत न्यूज नेटवर्कलेह/नवी दिल्ली : लडाखच्या तुरतुक सेक्टरमध्ये जवानांना नेणारी लष्कराची बस नदीमध्ये काेसळून झालेल्या अपघातात ७ जवानांचा मृत्यू झाला असून, १९ जवान जखमी झाले आहेत.  लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, २६ जवानांची तुकडी परतापूर येथून लेहमध्ये हनीफ सबसेक्टरच्या फाॅरवर्ड पाेस्टवर जात हाेती. थाेइसेपासून २५ किलाेमीटर अंतरावर सकाळी अपघात झाला. जवानांना नेणारी बस अनियंत्रित झाली आणि श्याेक नदीत सुमारे ५० ते ६० फूट खाेल काेसळली. सर्व २६ जवानांना बाहेर काढून परतापूर येथील लष्करी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना ७ जवानांची प्राणज्याेत मालवली. तर, १९ जखमी जवानांना हरयाणात हलविले. 

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी जवानांच्या अपघाती मृत्यूंबद्दल दु:ख व्यक्त केले. जखमी जवान लवकर बरे हाेतील, अशी प्रार्थना करुन सर्व प्रभावितांना सर्वताेपरी मदत करण्यात येईल, असे ट्वीट त्यांनी केले. लाेकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही या घटनेबद्दल शाेक संवेदना व्यक्त केल्या.

गडहिंग्लजवर शोककळा या अपघातात गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे येथील प्रशांत शिवाजी जाधव (२७) या जवानाचा मृत्यू झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण एस. एम. हायस्कूलमध्ये, तर उच्च माध्यमिक शिक्षण जागृती प्रशालेत झाले. त्यांचे वडीलही सैन्यदलातून सेवानिवृत्त आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, तीन बहिणी, असा परिवार आहे. जानेवारी २०२० मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांना एक वर्षाची मुलगी आहे. घरातील एकुलत्या कर्त्या मुलाच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

प्रशांत जाधव यांचे पार्थिव विमानाने बेळगाव येथे आणले जाईल. तेथून सैन्यदलाच्या वाहनातून जन्मगावी आणण्यात येईल व लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. 

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानAccidentअपघातkolhapurकोल्हापूर