शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील बालिंगा येथे ज्वेलर्सवर भरदिवसा सशस्त्र दरोडा, गोळीबारात दोघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 11:24 IST

सुमारे तीन किलो दागिने लंपास

कोल्हापूर/कोपार्डे : बालिंगा (ता. करवीर) येथे बस स्टॉपजवळ मुख्य रस्त्यालगत असलेल्या कात्यायनी ज्वेलर्सवर दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून सुमारे पावणेदोन कोटींचे तीन किलो सोन्याचे दागिने आणि दीड लाखाची रोकड लंपास केली. ही घटना गुरुवारी (दि. ८) दुपारी दोन ते सव्वादोन या वेळेत घडली.दरोडेखोरांसोबत झालेल्या झटापटीत ज्वेलर्सचे मालक रमेश शंकरजी माळी (वय ४०, सध्या रा. बालिंगा, मूळ रा. राजस्थान) आणि त्यांचा मेहुणा जितू मोड्याजी माळी (३०, रा. बालिंगा) हे दोघे गंभीर जखमी झाले. घटनेदरम्यान दुकानात असलेला १३ वर्षांचा मुलगा पीयूष रमेश माळी हा प्रसंगावधान राखून स्ट्राँगरूममध्ये लपून बसल्याने सुदैवाने बचावला.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे राजस्थान येथील माळी कुटुंबीय बालिंगा येथे स्थायिक झाले असून, त्यांचे कात्यायनी ज्वेलर्स हे दुकान बस स्टॉपपासून जवळच आहे. गुरुवारी दुपारी दुकानाचे मालक रमेश माळी त्यांचा मेहुणा जितू आणि मुलगा पीयूष हे तिघे दुकानात होते. दोनच्या सुमारास दोन व्यक्ती दुकानात आल्या. यातील एकाच्या डोक्यावर हेल्मेट होते, तर दुसऱ्याने रुमालाने चेहरा झाकला होता. आत शिरताच त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवत सर्व दागिने दोन पिशव्यांमध्ये भरण्यास सांगितले.दुकानाचे मालक माळी यांनी प्रतिकार करताच एका दरोडेखोराने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली, तर दुसऱ्याने पिस्तुलाच्या गोळ्या झाडून दुकानातील कपाटांच्या काचा फोडल्या. सुमारे ४० ट्रेमधील तीन किलो दागिने आणि दीड लाखाची रोकड घेऊन दरोडेखोरांनी पळ काढला. दोन दुचाकींवरून चौघे गगनबावड्याच्या दिशेने गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.यावेळी झालेल्या झटापटीत रमेश यांच्या पोटात आणि पायाला गोळी लागल्याने ते जमिनीवर कोसळले. बाहेर पडणाऱ्या दरोडेखोरांपैकी एकाला रोखण्याचा प्रयत्न जितू माळी यांनी केला. मात्र, दरोडेखोराने डोक्यात काचेचा तुकडा मारल्याने ते जागीच कोसळले. बाहेर येताच दरोडेखोरांनी गोळ्या झाडून दुकानाच्या काचा फोडल्या. त्यानंतर लोकांना पिस्तुलाचा धाक दाखवत ते दुचाकीवरून भरधाव वेगात निघून गेले.आसपासच्या दुकानांमधील नागरिकांनी तातडीने याची माहिती करवीर पोलिसांना देऊन जखमींना उपचारासाठी राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या दोन पथकांकडून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटाविशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, करवीरचे उपअधीक्षक संकेत गोसावी, करवीरचे निरीक्षक अरविंद काळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. फॉरेन्सिकचे पथक, ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथकाने दरोडेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, फारसे काही हाती लागले नाही.

लपून बसल्याने मुलगा बचावला

दरोडेखोरांनी झटापट करताच दुकानातील भेदरलेला मुलगा पीयूष हा कोपऱ्यातील स्ट्राँगरूममध्ये जाऊन लपला. दरोडेखोर दुकानाबाहेर पडल्यानंतरच तो खोलीतून बाहेर आल्याने त्याला कोणतीही इजा झाली नाही. तसेच स्ट्राँगरूममधील चांदी आणि रोकड सुरक्षित राहिली. मात्र, या घटनेने तो प्रचंड घाबरला होता. त्यानेच घटनेची सर्व माहिती पोलिस अधिकाऱ्यांना सांगितली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस