शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

सशस्त्र सेना ध्वज दिन : मशिन गन्स, रॉकेट लॉंंचर पाहून कोल्हापुरातील विद्यार्थी अचंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 11:44 IST

एरवी चित्रपटामध्ये पहायला मिळणाऱ्या मशिन गन्स, रॉकेट लॉंचर प्रत्यक्ष पहायला मिळाल्याने कोल्हापुरातील १00 हून अधिक शाळांमधील विद्यार्थी अचंबित झाले. निमित्त होते खासदार संभाजीराजे यांनी आयोजित केलेल्या सशस्त्र सेना ध्वज निधी दिनाचे.

ठळक मुद्देमशिन गन्स, रॉकेट लॉंंचर पाहून विद्यार्थी अचंबितछत्रपती संभाजीराजे फाउंडेशनतर्फे सशस्त्र सेना ध्वज दिनविद्यार्थ्यांनी घेतली शस्त्रास्त्रांची माहिती

कोल्हापूर : एरवी चित्रपटामध्ये पहायला मिळणाऱ्या मशिन गन्स, रॉकेट लॉंचर प्रत्यक्ष पहायला मिळाल्याने कोल्हापुरातील १00 हून अधिक शाळांमधील विद्यार्थी अचंबित झाले. निमित्त होते खासदार संभाजीराजे यांनी आयोजित केलेल्या सशस्त्र सेना ध्वज निधी दिनाचे.छत्रपती संभाजीराजे फाउंडेशनने १0९ टेरिटोरयिल आर्मी मराठा लाईट इन्फ्रंटीच्या सहकार्याने सैन्यदलातील विविध शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन मराठा लाईट इन्फन्ट्री बटालियन येथे भरविण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी या शस्त्रास्त्रांची माहिती घेतली. 

यावेळी तिरंगी फुगे सोडून संभाजीराजे, संयोगिताराजे, परमजित कौर, कर्नल दिलीपसिंग मंडलिक, ले.कर्नल मिलिंद शिंदे आदिंनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी वीरमाता, वीरपत्नींचा सत्कार करताना वातावरण भावपूर्ण बनले.यावेळी विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांंचा गौरव करण्यात आला. तसेच या सर्वांना एनडीएची अभ्यास सहल घडवून आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सैन्य दले आणि जनता यांच्यातील अंतर कमी व्हावे यासाठी आपण या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.भारतीय सशस्त्र दलांना या शस्त्रास्त्रांचा उपयोग आपल्या सीमांचे रक्षण करण्याकरिता होतो. ती शस्त्रास्त्रे शालेय विद्यार्थ्यांना टेंबलाई हिल येथील १०९ टेरिटोरयिल आर्मी मराठा लाईट इन्फन्ट्री बटालियन येथे पहायला मिळाली. या प्रदर्शनामध्ये ठेवलेली लष्करी शस्त्रास्त्रे ही प्रमुख्याने लहान श्रेणीतील शस्त्रे आहेत आणि त्यांची क्षमता प्रतिबंधित आहे.मध्यम मशीन गन्स, रॉकेट लॉंचर्स, आॅटोमेटीक ग्रेनेड लॉंचर्स आणि अँटी टँक गाईडेड मिसाईल लॉंचर्स आणि इतर अनेक लहान शस्त्रे, संपर्क साधने आणि रात्रीच्या अंधारात दिसायला मदत करणारी साधने अशी मुलांना रस वाटेल अशी ही शस्त्रास्त्रे आहेत. 

टॅग्स :Armed Forces Flag Dayसशस्त्र सेना ध्वज दिनkolhapurकोल्हापूर