शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: संकेश्वरनजीक धावती आरामबस पेटली; सुदैवाने प्रवाशी, चालक-वाहक सुखरूप बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 14:10 IST

प्रवाशांनी अक्षरशः हात जोडले..!

राम मगदूम गडहिंग्लज (जि.कोल्हापूर) : संकेश्वरनजीक भरधाव खासगी आराम बसचे ब्रेक लाइनिंग जाम होऊन घर्षणामुळे लागलेल्या आगीत बस जळून खाक झाली. परंतु, केवळ दैव बलवत्तर म्हणून बसमधील २८ प्रवाशासह चालक -वाहक सुखरूप बचावले. या दुर्घटनेत  प्रवाशांच्या साहित्यासह बसचे सुमारे ३० लाखांचे नुकसान झाले. पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर  संकेश्वरनजीक सोलापूर फाटयावर ही घटना घडली.   घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शर्मा ट्रॅव्हल्सची आराम बस (क्रमांक पी.वाय.०१/डी. ए.७६७६) मुंबईहून बंगळुरूला जात होती. बसमध्ये एकूण २८ प्रवाशी  होते. शुक्रवारी पहाटे सोलापूर व हरगापूर गावच्या फाट्याजवळ पाठीमागील चाकाचे ब्रेक लाइनिंग जाम होवून घर्षणामुळे बसला आग लागली. बसला आग लागल्याचे बसचालक सिद्धाप्पा यांच्या निदर्शनास आले. प्रसंगावधान राखून त्यांनी वेग कमी करत बस रस्त्याच्या कडेला घेतली आणि प्रवाशांना तातडीने खाली उतरवले,त्यामुळे कोणताही जिवितहानी झाली नाही.दरम्यान, पाठीमागील आग पसरत जाऊन इंजिन, गॅस टॅंक आणि वातानुकूलित यंत्रणेपर्यंत पोहोचल्याने संपूर्ण बस पेटली. ही बातमी समजताच महामार्ग रुंदीकरण कामाचे ठेकेदार  कंपनीचे भरारी पथक, संकेश्वर नगरपालिकेचे अग्निशामन दल व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या पथकाने मोठ्या शर्थीने आग विझवण्याचा प्रयत्न केला.तथापि, गाडीतील फायबर सीट आणि कुशनमुळे आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण बस जळून खाक  झाली.त्यामुळे घटनास्थळी आराम बसचा केवळ लोखंडी सांगाडाच  शिल्लक राहिला. या घटनेची नोंद संकेश्वर पोलीस ठाण्यात झाली आहे.

प्रवाशांनी अक्षरशः हात जोडले..!आराम बसमधील सर्व प्रवासी धारवाड, हुबळी व बंगळुरू परिसरातील होते. पहाटेच्या साखर झोपेत असताना अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ते सैरभैर झाले होते. जिवाच्या आकांताने सगळे बसमधून बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. डोळयादेखत जळणारी बस पाहताना त्यांच्या अंगावर शहारे येत होते. बसमधून बाहेर पडल्यानंतर प्रवाशांनी अक्षरशः हात जोडून देवाचे आणि चालकाचे आभार मानले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfireआग