‘गोकुळ’च्या भारत पेट्रोलियमच्‍या पेट्रोल पंपास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:25 IST2021-08-15T04:25:19+5:302021-08-15T04:25:19+5:30

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या गोकुळ शिरगाव दूध प्रकल्प येथे भारत पेट्रोलियम कार्पेारेशन या कंपनीच्या पेट्रोल व ...

Approval of Gokul's Bharat Petroleum's petrol pump | ‘गोकुळ’च्या भारत पेट्रोलियमच्‍या पेट्रोल पंपास मंजुरी

‘गोकुळ’च्या भारत पेट्रोलियमच्‍या पेट्रोल पंपास मंजुरी

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या गोकुळ शिरगाव दूध प्रकल्प येथे भारत पेट्रोलियम कार्पेारेशन या कंपनीच्या पेट्रोल व डिझेल पंपास मंजुरी मिळाली आहे. कंपनीचे गोवा व्यवस्थापक अभिजित पानारी यांनी संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे मंजुरीचे पत्र दिले.

संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले, संघाचा पेट्रोल पंप व्हावा, अशी अनेक वर्षांची इच्छा होती, ती आता पूर्णत्वास गेली आहे. संघाच्या महामार्गानजीक जागेत पंप सुरू होत असून, अत्याधुनिक सेवासुविधा ग्राहकांना मिळणार आहेत. संघाच्या दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांसह कर्मचारी व परिसरातील नागरिकांना लाभ होणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले. यावेळी संचालक अरुण डोंगळे, अजित नरके, बाबासाहेब चौगले, बाळासाहेब खाडे, संतोष साहणी, नानासाहेब सुगावकर, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : ‘गोकुळ’च्या भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपाच्या मंजुरीचे पत्र कंपनीचे गोवा व्यवस्थापक अभिजित पानारी यांनी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी बाळासाहेब खाडे, अरुण डोंगळे, बाबासाहेब चौगले, अजित नरके आदी उपस्थित होते. (फोटो-१४०८२०२१-कोल-गोकुळ)

Web Title: Approval of Gokul's Bharat Petroleum's petrol pump