२५ कोटींच्या रस्त्यांच्या कामास, व्यापारी संकुलास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 16:54 IST2020-03-19T16:53:08+5:302020-03-19T16:54:36+5:30

मूलभूत सेवा व सुविधा पुरविण्यासाठी राज्य सरकारच्या २५ कोटी निधी अंतर्गत प्रस्ताविक रस्त्यांच्या कामांना तसेच कोंबडी बाजार येथील व्यापारी संकुल उभारण्याच्या कामास गुरुवारी झालेल्या महानगरपालिकेच्या सभेत मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर निलोफर आजरेकर होत्या.

Approval of 2 crore road works, commercial complexes | २५ कोटींच्या रस्त्यांच्या कामास, व्यापारी संकुलास मंजुरी

२५ कोटींच्या रस्त्यांच्या कामास, व्यापारी संकुलास मंजुरी

ठळक मुद्दे२५ कोटींच्या रस्त्यांच्या कामास, व्यापारी संकुलास मंजुरीमहापालिका सभेत निर्णय

कोल्हापूर : मूलभूत सेवा व सुविधा पुरविण्यासाठी राज्य सरकारच्या २५ कोटी निधी अंतर्गत प्रस्ताविक रस्त्यांच्या कामांना तसेच कोंबडी बाजार येथील व्यापारी संकुल उभारण्याच्या कामास गुरुवारी झालेल्या महानगरपालिकेच्या सभेत मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर निलोफर आजरेकर होत्या.

कोल्हापूर महानगरपालिकेची सभा गुरुवारी होणार होती, ती कोरोना विषाणूंच्या संसर्गाच्या भीतीपोटी रद्द करण्यात आली; परंतु विषयपत्रिकेवरील दोन महत्त्वाच्या विषयांना कोणत्याही परिस्थितीत मंजुरी देणे आवश्यक वाटल्यामुळे, ही सभा रद्द न करता घेण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार ही सभा झाली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभा १५ मिनिटांत आटोपती घेण्यात आली. सभेला स्थायी सभापती संदीप कवाळे, गटनेते शारंगधर देशमुख, विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम, राहुल चव्हाण यांच्यासह मोजकेच नगरसेवक उपस्थित होते.

 

Web Title: Approval of 2 crore road works, commercial complexes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.