शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

कोल्हापूरच्या हद्दवाढीवर २०२४ पूर्वी योग्य तो निर्णय, महिन्याभरात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; पालकमंत्र्यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 13:26 IST

बैठकीत प्रचंड गदारोळ, घोषणाबाजीने तणाव

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढ प्रश्नी एक महिन्याच्या आत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत सर्वसमावेशक बैठक घेतली जाईल. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन २०२४ पूर्वी हद्दवाढीवर योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी रात्री येथे आयोजित केलेल्या बैठकीत दिली. कोल्हापूर क्षेत्र नागरी विकास प्राधिकरण अधिक सक्षम करण्याची आवश्यकताही त्यांनी बोलून दाखविली.हद्दवाढ प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री केसरकर यांनी हद्दवाढ समर्थक आणि विरोधक यांची बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. सुमारे दोन तास ही बैठक झाली. बैठकीचा समारोप करताना केसरकर यांनी ही ग्वाही दिली.हद्दवाढीबाबत दोन्ही बाजूच्या प्रतिक्रिया तीव्र आहेत. हद्दवाढीचा निर्णय घेण्याचा अधिकार जरी राज्य सरकारचा असला तरी ग्रामीण जनतेला विश्वासात घ्यावेच लागेल. म्हणूनच पुन्हा एकदा एक महिन्याच्या आत मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठक घेतली जाईल. तुम्ही म्हणाला तर समर्थक आणि विरोधक यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या जातील. गेल्या बावीस वर्षात हद्दवाढीवर निर्णय झाला नाही, पण आम्ही मात्र २०२४ पूर्वी तो घेऊ, असे केसरकर म्हणाले.कोल्हापूर क्षेत्र नागरी विकास प्राधिकरण स्थापन करण्यामागे गावांचा विकास करण्याचा प्रमुख हेतू होता. प्राधिकरणाच्या माध्यमातून गावांचा विकास करुन ती कोल्हापूर शहरात समाविष्ट करायची होती. परंतु प्राधिकरणाकडे तितक्या गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे प्राधिकरण सुद्धा अधिक सक्षम करण्यावर जोर दिला पाहिजे असे माझं मत आहे.

प्राधिकरणाच्या माध्यमातून ग्रामीण विभागाचा विकास आराखडा तयार केला पाहिजे. क्रेडाई, आर्किटेक्ट असोसिएशनने जो १२ गावांचा प्रस्ताव दिला आहे, त्या गावांना जाऊन मी भेटी देणार आहे. तेथील जनतेशी चर्चा करणार आहे. मला काही वेळ द्या, असे केसरकर म्हणाले.

आडगुळे, पोवार, केसरकर शाब्दिक चकमककेसरकर यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन देताच ॲड. महादेवराव आडगुळे यांनी त्यांना मध्येच अडवून ‘हे किती वेळा आम्ही ऐकायचे’? असा प्रश्न केला. तेव्हा केसरकर संतप्त झाले. तुम्ही मध्येच बोलणार असाल तर मी बोलायचे थांबवितो. मलाही ही मिटिंग पुढे चालवायची इच्छा नाही.

खासदार धैर्यशील माने बोलत असताना आर.के. पोवार यांनी त्यांना अडविल्यानेही पालकमंत्री संतप्त झाले. आर.के. साहेब, माने खासदार आहेत, त्यांना अडवू नका. तुम्ही आणि मी एकत्र काम केले आहे. त्यामुळे इतरांचा मान राखा, असा सल्ला केसरकर यांनी पोवार यांना दिला.घोषणाबाजीने सभागृह दणाणलेजिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आधी हद्दवाढ विरोधी समितीच्या सदस्यांना बोलण्याची संधी दिली. त्यावेळी समर्थन समितीच्या सदस्यांनी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. परंतु बाबा इंदूलकर जेव्हा हद्दवाढीची बाजू मांडायला लागले तेव्हा मात्र विरोधी गटाने इंदूलकरांच्या बोलण्यात अडथळे आणायला सुरवात केली. तरीही बाबा इंदूलकर यांनी आपली बाजू ठामपणे मांडणे सुरुच ठेवले. त्यामुळे विरोधी गटाने सभागृहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. वातावरण थोडे तणावपूर्ण झाले. जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांनी आवाहन करुनही विरोधी गटाचे सदस्य सभागृहात बसले नाहीत, ते बाहेर निघून गेले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeepak Kesarkarदीपक केसरकर