शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

त्रिसदस्यीय सुकाणू समितीची नियुक्ती

By admin | Updated: July 31, 2014 23:29 IST

थेटपाईपलाईनवर वॉच : स्थायी सभापतींच्या अध्यतेखाली पाहणार काम; दर महिन्याला देणार अहवाल

कोल्हापूर : सल्लागार कंपनीवर विश्वास ठेवून रस्ते प्रकल्पासारखा घात करून घेण्यापेक्षा थेट पाईपलाईन योजनेवर लक्ष ठेवण्यासाठी स्थायी समिती सभापतींच्या अध्यक्षतेखाली दोन स्थायी सदस्यांचा समावेश असणाऱ्या सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती योजनेवर लक्ष ठेवून दर महिन्याला अहवाल देईल, असे स्पष्ट नमूद करून योजनेची निविदा स्थायी समितीने काल, बुधवारी रात्री आयुक्तांकडे पाठविली. आयुक्त उद्या, शुक्रवारी योजना मंजुरीचे पत्र ‘जीकेसी’ या ठेकेदारास देण्याची शक्यता आहे.महापालिकेकडे सक्षम लोक नाहीत. यासाठी प्रत्येक लहान-मोठ्या योजनेवर लक्ष ठेवण्यासाठी सल्लागार कंपनी नेमली आहे. शहरातील तब्बल ७०० कोटींचे प्रकल्प सल्लागार कंपनीने सक्षमपणे काम न केल्याने रखडले आहेत. महापालिकेतील अधिकारीही सल्लागार कंपनीकडे बोट दाखवून रिकामे होतात. यामुळे थेटपाईपलाईनसह सर्वच मोठ्या प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी सुकाणू समितीची स्थापना करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला होता. मात्र, योजनेवर लक्ष ठेवण्यासाठी सुकाणू समिती नको, असा पवित्रा काहींनी घेतला होता. अखेर स्थायी सभापतीसह दोघांचा समावेश असणारी समिती नेमून या योजेनेवर लक्ष ठेवण्यावर तोडगा निघाला.सल्लागार कंपनीने झाडे, भूसंपादन, मार्गातील बदल, अनुभवाचा दाखला याबाबत संदिग्धता निर्माण करणारा अहवाल दिल्याने यावरून महासभेतही मोठा गदारोळ झाला होता. यापूर्वीच्या झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पाईपलाईनसाठी दिलेल्या सर्व उपसूचना मागे घेण्यात आल्या होत्या. मात्र, सुकाणू समितीवरून निर्णय होऊ न शकल्याने निविदा प्रक्रिया रखडली होती. यावेळी योजनेवर लक्ष ठेवण्यासाठी महापौर व स्थायी समिती अध्यक्षांचा समावेश असलेली सुकाणू समितीची स्थापना करण्याचे ठरले होते. यामध्ये बदल करून फक्त स्थायी समिती सभापतीचा समावेश असलेली समिती नेमण्याचे ठरले. लवकरच ठेकेदारास मंजुरीचे पत्र दिले जाणार असून, १५ कोटी अनामत रक्कम भरण्यासाठी मुदत दिली जाईल. यानंतर ठेकेदारास वर्कआॅर्डर दिली जाणार आहे. (प्रतिनिधी)४कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना मार्गी लागली पाहिजे. मात्र, योजना अत्यंत पारदर्शी व सक्षमपणे पार पाडावी, यासाठी आलेल्या सूचना व शंकाचे स्वागतही प्रशासनाने केले पाहिजे. ---रस्ते प्रकल्पासारखी फसगत नको, यासाठी योजनेबाबत सर्वंकष चर्चा करण्यासाठी शनिवारी (दि. २) सर्व पक्षीय कृती समितीतर्फे बैठकीचे आयोजन केले आहे. ---सायंकाळी ४ वाजता मिरजकर तिकटी येथील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात होणाऱ्या बैठकीसाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बाबा इंदुलकर व निवास साळोख यांनी पत्रकाद्वारे केले आहे.---कृती समितीने यापूर्वीही आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी व महापौर सुनीता राऊत यांना योजना पारदर्शी व्हावी, यासाठी निवेदन दिले आहे. ---महापौर सुनीता राऊत यांनी सर्व शंकांचे निरसन झाल्याशिवाय ठेकेदारास वर्कआॅर्डर देऊ नका, असा आदेश देऊनही प्रशासन काम सुरू करण्याची घाई करीत आहे, असा आरोप इंदुलकर यांनी केला आहे. ----जनतेची मते जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले असून, बैठकीत पुढील दिशा व योजनेच्या सर्व पैलूंवर चर्चा केली जाणार आहे.