भरमूआण्णा, समरजित, अमल, सत्यजित कदम जिल्हा नियोजनवर; बैठकीच्या ४८ तास आधी सदस्यांची नियुक्ती
By समीर देशपांडे | Updated: December 22, 2022 19:04 IST2022-12-22T18:38:45+5:302022-12-22T19:04:07+5:30
उद्याच्या बैठकीच्या ४८ तास आधी समितीवरील सदस्यांची नियुक्ती

भरमूआण्णा, समरजित, अमल, सत्यजित कदम जिल्हा नियोजनवर; बैठकीच्या ४८ तास आधी सदस्यांची नियुक्ती
कोल्हापूर : गेले अनेक दिवस प्रतिक्षेत असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या उद्याच्या बैठकीच्या ४८ तास आधी समितीवरील सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत शासन आदेश आज, गुरूवारी काढण्यात आला. त्यामुळे हे सर्व नुतन सदस्य शनिवारी दुपारी २ वाजता होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
विधानमंडळ किंवा संसद सदस्यातून खासदार संजय मंडलिक आणि आमदार विनय कोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा नियोजनाबाबत ज्ञान आणि अनुभव असलेल्या अन्य १८ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यामध्ये माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, माजी आमदार अमल महाडिक, सत्यजित कदम, प्रतापराव देशमुख [नरंदे], यशवंत नांदेकर[ तिरवडे], आण्णाभाऊ संस्था समुहाचे प्रमुख अशोक चराटी [आजरा], माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे [तारदाळ], राहूल देसाई [भुदरगड], अमित कामत[आर.के.नगर मोरेवाडी], माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने [शिरोळ],
सत्यजित पाटील [सोनाळी, कागल], शिवाजी चौगुले [ पंडेवाडी, राधानगरी], चंद्रकांत मोरे [शिरढोण, शिरोळ], दशरथ काळे [अब्दूललाट शिरोळ], संजय पोवार आणि अंकुश निपाणीकर [ राजारामपुरी कोल्हापूर] आणि माणगावचे सरपंच राजू उर्फ अभयकुमार मगदूम यांचा समावेश आहे.