शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण समन्वयासाठी चार अधिकाऱ्यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:25 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना विषाणू संबंधित रुग्णालयातील कामकाजात अधिकाधिक सुसूत्रता आणण्यासाठी आणि या रुग्णालयांचे ...

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना विषाणू संबंधित रुग्णालयातील कामकाजात अधिकाधिक सुसूत्रता आणण्यासाठी आणि या रुग्णालयांचे कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चार स्वतंत्र अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी बुधवारी हा आदेश काढला.

या आदेशानुसार सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे हे छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे समन्वय अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहेत. महापालिकेचे उपायुक्त रविकांत आडसूळ यांच्याकडे डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता मिलिंद कुलकर्णी यांच्याकडे इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाची तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरूड यांच्याकडे उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथील समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. या प्रत्येक अधिकाऱ्याकडे पाच संगणकचालकही देण्यात आले आहेत.

चौकट

नेमून दिलेली कामे

१) रुग्णालयातील अतिदक्षता विभाग व कोरोना वाॅर्ड रुग्णांसाठी खाटा उपलब्धतेच्या नोंदी घेणे.

२) काेविड रुग्णव्यवस्थापन संगणक प्रणाली आस्थापित करून प्रत्येक रुग्णाची संगणक प्रणालीमध्ये आवक, जावक नोंदी घेणे.

३) रुग्णालयातील सुरक्षेसाठी नियुक्त यंत्रणा, रुग्णांना जेवण पुरवणारी यंत्रणा, स्वच्छता व निर्जंतुकीकरण यंत्रणा, वाहतूकव्यवस्था, मदत कक्ष इ. बाबत समन्वय अधिकाऱ्यांना मदत करणे.

४) प्रत्येक वॉर्डातील स्वच्छता, निर्जंतुकीकरण व्यवस्थापन, रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या सर्व सोयी-सुविधा, नोंदणी, डिस्चार्ज याच्या नोंदी ठेवणे.

५) गंभीर व अतिगंभीर रुग्णांची संबंधित स्टाफकडून रोज तपासणी होते का आणि नोंदी घेतल्या जातात का, याची खात्री करणे.

६) दैनंदिन येणाऱ्या रुग्णांच्या नोंदींबाबत खात्री करणे.

७) संबंधित रुग्णालयांकडून प्रयोगाशाळांकडे रुग्णांचे घेण्यात आलेले नमुने वेळेवर व अचूक पोहोचतील याबाबत व्यवस्था करण्यात आली आहे, याची खात्री करणे.

८) रुग्णांचे नमुने घेताना विहित नमुन्यातील फॉर्ममध्ये रुग्णाचे नाव, पत्ता, तसेच संपर्क क्रमांक अचूकपणे भरण्यात येत आहे का, याची खात्री करणे.

९) जनतेसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आलेला असून, तो २४ तास सुरू राहील याची खातरजमा करणे.