आप्पासाहेब पोवार निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:30 IST2021-06-09T04:30:22+5:302021-06-09T04:30:22+5:30
निधन वार्ता १) आप्पासाहेब पोवार यांचे निधन गडहिंग्लज : येथील इलेक्ट्रिकल व्यापारी आप्पासाहेब भाऊ पोवार (वय ६७, मूळ ...

आप्पासाहेब पोवार निधन
निधन वार्ता १) आप्पासाहेब पोवार यांचे निधन
गडहिंग्लज : येथील इलेक्ट्रिकल व्यापारी आप्पासाहेब भाऊ पोवार (वय ६७, मूळ गाव करंबळी, ता. गडहिंग्लज) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, चार भाऊ, दोन बहिणी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष के. बी. पोवार यांचे ते बंधू होत. रक्षाविसर्जन, बुधवार (८)ला सकाळी आहे.
* आप्पासाहेब पोवार : ०७०६२०२१-गड-०६
-----------------------
२) सरस्वती डुरे यांचे निधन
चंदगड : आंबेवाडी (ता. चंदगड) येथील ज्येष्ठ नागरिक सरस्वती मसणू डुरे (वय ७५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुो, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मुख्याध्यापिका वैजयंता शिंदे यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन, उद्या(बुधवार)ला सकाळी आहे.
* सरस्वती डुरे : ०७०६२०२१-गड-०५