शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी रेखावार यांच्याकडून दिलगिरी, मराठा आरक्षणाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले नसल्याचा खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 11:56 IST

मंत्र्यांसोबत झालेल्या गोपनीय बैठकीतील चर्चेविषयी जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्यास राज्यात दंगली होतील किंवा मराठा समाजाला आरक्षण दिल्यास जाळपोळ होईल, असे मत व्यक्त केल्याचे वृत्त माध्यमातून प्रकाशित झाले होते. त्यावर अशी कोणतीही बाब बैठकीत घडली नसल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी रेखावार यांनी स्वत: दिले होते. या मुद्यावर सोमवारी त्यांनी पुन्हा स्पष्टीकरण देत आपण कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नसल्याचा खुलासा केला आहे. कुणालाही कधीही जाणीवपूर्वक दुखावण्याचा आपला हेतू कधीच नसतो. मंत्र्यांसोबत झालेल्या गोपनीय बैठकीतील चर्चेविषयी जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे रेखावार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्या बैठकीत आपल्या कोणत्याही वक्तव्याद्वारे जर कुणीही दुखावले गेले असेल, तर आपण दिलगिरी व्यक्त करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.या प्रकरणावरून मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची बदली करण्याची मागणी केली होती, तसेच याप्रकरणी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी निवेदन देऊन लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी रेखावार याबाबत खुलासा करतील, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारीMaratha Reservationमराठा आरक्षण