राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत अनुष्का पाटील हिला तिहेरी सुवर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 17:51 IST2019-11-20T17:49:40+5:302019-11-20T17:51:06+5:30
दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथील डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी जलतरण तलाव येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अनुष्काने २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये २.४३.७८ इतकी विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकाविले.

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत अनुष्का पाटील हिला तिहेरी सुवर्ण
कोल्हापूर : नवी दिल्ली येथे सुरूअसलेल्या ६५ व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या अनुष्का सयाजी पाटील हिने एका राष्ट्रीय विक्रमासह तीन सुवर्णपदकांची कमाई केली.
दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथील डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी जलतरण तलाव येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अनुष्काने २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये २.४३.७८ इतकी विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकाविले. तिच्या नावे हा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित झाला. यासोबतच २०० मीटर आयएममध्ये तिने २.३६.३२ अशी वेळ नोंदवत याही प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. सांघिकमध्येही ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये तिने सुवर्णपदकांची कमाई केली. ती सावर्डे तर्फ सातवे (ता. पन्हाळा) येथील भा. रा. यादव हायस्कूलची विद्यार्थिनी असून, तिला श्रीकांत जांभळे, मानसिंग पाटील व डॉल्फिन अॅक्वॅटिक (बंगलोर)चे निहार अमीन, मधू सर, युर्वेश सर, आदींचे मार्गदर्शन लाभले.