प्लास्टिक पिशव्या विरोधी कारवाई; १४ दुकानदारांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:22 IST2020-12-24T04:22:29+5:302020-12-24T04:22:29+5:30
कोल्हापूर : प्लास्टिक पिशव्या बंदी आदेशानुसार बुधवारी महापालिकेच्या पथकांनी लक्ष्मीपुरी, ताराबाई पार्क, कसबा बावडा परिसरातील १४ दुकानांना प्रत्येकी ...

प्लास्टिक पिशव्या विरोधी कारवाई; १४ दुकानदारांना दंड
कोल्हापूर : प्लास्टिक पिशव्या बंदी आदेशानुसार बुधवारी महापालिकेच्या पथकांनी लक्ष्मीपुरी, ताराबाई पार्क, कसबा बावडा परिसरातील १४ दुकानांना प्रत्येकी पाच हजारप्रमाणे ७० हजार दंडाची कारवाई करण्यात आली.
शासनाच्या आदेशानुसार प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदी असतांनाही काही व्यापारी, व्यावसायिक प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत आहे. त्यांच्यावर बुधवारपासून महापालिका पथकामार्फत धडक मोहीम सुरू केली आहे. या पथकाने लक्ष्मीपुरी ताराबाई पार्क, कसबा बावडा परिसरातील पंचवटी स्वीटस, नॅशनल बेकरी, मुकुंदप्रभा, केक फॉर यू, पुरोहित स्वीटस, चॉईस पान शॉप, डायमंड चिकन, बाबा ट्रेडींग कंपनी, श्री इंगवले, खाटीक मटण, ओम मेडीकल, श्री साई मेडीकल, ज्योती स्वीटस, किरण ट्रेडर्स अशा १४ दुकानदारांवर कारवाई करून प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली.
ही कारवाई मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, विभागीय आरोग्य निरीक्षक निखिल पाडळकर, राहुल राजगोळकर, गीता लखन, ऋषीकेश सरनाईक, शिवाजी शिंदे, महेश भोसले यांनी केली.
आरोग्य विभागाची पाच पथके कार्यरत-
शहरातील प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी महापालिकेने पाच पथके तैनात केली असून, प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम राबविली जात आहे. प्लास्टिक व थर्माकॉल प्रतिबंधक नियम २०१८ नुसार प्लास्टिक व थर्माकॉलचा वापर केल्याचे निदर्शनास आल्यास प्लास्टिक साठा जप्त करण्याबरोबरच प्रथम दंड पाच हजार रुपये, द्वितीय दंड १० हजार रुपये आणि तृतीय दंड २५ हजार रुपये आणि तीन वर्षांचा कारावास होऊ शकतो.