शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
2
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
3
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
4
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
5
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
6
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
7
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
8
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
9
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
10
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
11
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
12
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
13
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
14
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
15
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
16
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
17
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
18
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
19
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
20
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 

Kolhapur: प्रांताधिकाऱ्यांच्या नावे वकिलाने घेतली लाच, २५ हजार रुपये घेताना 'लाचलुचपत'ने पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 11:44 IST

'प्रांत कार्यालयातून पैशांची मागणी झालीच नव्हती'

कोल्हापूर : तक्रारदारांच्या मिळकतीवरील ब सत्ता प्रकार कमी केल्याचा करवीर प्रांताधिकाऱ्यांचा आदेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून वकील विनायक सुरेश तेजम (वय ३७, रा. मंजुळा अपार्टमेंट, शाहूपुरी, कोल्हापूर) याने तक्रारदारांकडून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. करवीर प्रांताधिकाऱ्यांच्या नावे लाच उकळल्याप्रकरणी ॲड. तेजम याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि.२५) सायंकाळी महालक्ष्मी चेंबर येथे ॲड. तेजम याच्या कार्यालयात झाली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांनी ॲड. तेजम याच्यामार्फत त्यांच्या कोल्हापुरातील मिळकतीचा ब सत्ता प्रकार बदलण्यासाठी करवीर प्रांताधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. या कामासाठी ॲड. तेजम याने तक्रारदारांकडून एक लाख ६५ हजार रुपये घेतले होते. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांना देण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने अर्ज करताच त्याची पडताळणी करून सापळा रचला असता, ॲड. तेजम हा २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ सापडला.याबाबत त्याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाने कारवाई केली.'प्रांत कार्यालयातून पैशांची मागणी झालीच नव्हती'कामाचे शुल्क म्हणून ॲड. तेजम याने तक्रारदारांकडून एक लाख ६५ हजार रुपये घेतले होते. त्यानंतर प्रांत कार्यालयात एक लाख रुपये द्यावे लागतील असे सांगून २५ हजार रुपये स्वीकारले. प्रांत कार्यालयातून पैशांची मागणी झाली होती काय ? याची पडताळणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. मात्र, यात तथ्य आढळले नाही, अशी माहिती उपअधीक्षक पाटील यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Lawyer caught taking bribe in official's name, arrested.

Web Summary : A Kolhapur lawyer was arrested for accepting a ₹25,000 bribe, falsely claiming it was for a government official to expedite a property matter. Anti-Corruption Bureau investigation revealed no such demand from the official.