शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: सुशाबाईंचे निधन, धक्क्याने गौराबाईंनीही सोडला प्राण!, नौकुडमधील हृदयद्रावक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:57 IST

एकीची रक्षा..दुसरीचे दहन, सख्ख्या बहिणी..सख्ख्या जावा 

गडहिंग्लज : वयोमानानुसार आलेल्या किरकोळ आजारपणामुळे सुशाबाईंचे निधन झाले. त्यांच्या रक्षाविसर्जनाची तयारी सुरू असतानाच गौराबाईंनीही प्राण सोडला. सासर-माहेर गावातच असणाऱ्या दोघीही सख्ख्या बहिणी व सख्ख्या जावा होत्या. नौकुड येथील या हृदयद्रावक घटनेमुळे हलकर्णी पंचक्रोशीसह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.हकीकत अशी, नौकुड येथील वयोवृद्ध शेतकरी मारुती मांगले व संतराम मांगले हे सख्खे चुलत भाऊ आहेत. सुशाबाई या मारुती यांच्या, तर गौराबाई या संतराम यांच्या अर्धांगिनी होत्या. सुशाबाईंच्या पश्चात पती, मुलगा, तीन मुली, तर गौराबाईंच्या पश्चात पती, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

लहानपणापासून दोघीही एकत्र वाढल्या, दोघींची लग्नही एकाचवेळी झाली. जावा-जावा असूनही त्यांची मैत्री घट्ट होती. एकमेकांची सुख-दु:ख वाटून घेत कौटुंबिक जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडत दोघींनीही सुखाचा संसार केला. म्हणूनच, सुशाबाईंच्या मृत्यूने आलेल्या विरहाच्या धक्क्याने गौराबाईंनीही जगाचा निरोप घेतला.

घराघरांशी ऋणानुबंधसुशाबाईंचा मुलगा जोतिबा हा पोस्टमन असून त्यांचे घर म्हणजेच पोस्ट ऑफिस आहे. त्यामुळे घरात नेहमी लोकांचा राबता असतो; परंतु त्या घरी येणाऱ्या प्रत्येकाची अगत्याने विचारपूस करून चहा दिल्याशिवाय सोडायच्या नाहीत. त्यामुळे घराघरांशी त्यांचे ऋणानुबंध जुळले होते.

एकीची रक्षा..दुसरीचे दहन..!धाकटी बहीण सुशाबाईंच्या रक्षाविसर्जनाची तयारी सुरू असतानाच थोरली बहीण गौराबाईंचे निधन झाले. त्यामुळे सुशाबाईंच्या रक्षाविसर्जनाला आलेल्या नातेवाईक आणि ग्रामस्थांना गौराबाईंवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. तिचे रक्षाविसर्जन, आज (सोमवारी) आहे.

नव्वदीतील भावांनाही धक्काजाधव घराण्यातील गौराबाई व सुशाबाई यांना बैजू व बाबू हे दोन भाऊ आहेत. गावातील आबालवृद्ध त्यांना गौराआई व सुशाआई या नावानेच हाक मारत. दोघीही अत्यंत प्रेमळ, मनमिळाऊ, परोपकारी व सरळमार्गी होत्या. सुख-दु:खाच्या प्रसंगात लोकांच्या मदतीला त्या धावून जायच्या. त्यांच्या निधनाने संपूर्ण नौकुड गावावर शोककळा पसरली आहे. दोन्ही बहिणींचा पाठोपाठ मृत्यू झाल्याने त्यांच्या नव्वदीतील भावांनाही धक्का बसला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू