शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- Phulewadi Fire Station building slab collapses: थांबा थांबा.. ढिगाऱ्याखाली अजून एकजण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 12:13 IST

नातेवाईकांचा आक्रोश

कोल्हापूर : थांबा थांबा.. कोसळलेल्या स्लॅबखाली आणखी एकजण अडकलाय, असा आवाज आला अन् बचाव पथकासह उपस्थित अधिकाऱ्यांच्या काळजात धस्स झालं. महापालिकेच्या फुलेवाडी येथील फायर स्टेशन क्रमांक पाचच्या नव्या इमारतीचा स्लॅब कोसळल्यानंतर त्यातील पाच जखमींना बाहेर काढल्यानंतर बचाव पथकाने सुटकेचा निश्वास सोडला होता. स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली आणखी कोणी नाही ना याची खात्री अधिकारी वारंवार करत होते. मात्र, बचाव पथकाने आता कुणीच नाही असे सांगितलेही. मात्र, मजुरांपैकीच एकाने एक महिला दिसत नसल्याचे सांगत ‘थांबा थांबा, कोसळलेल्या स्लॅबखाली आणखी एकजण अडकलाय,’ असा आवाज दिला अन् सगळेच स्तब्ध झाले. बचाव पथकाने पुन्हा शोधमोहीम सुरू केली.

वाचा- कोल्हापूर महापालिकेच्या फुलेवाडी फायर स्टेशनच्या नव्या इमारतीचा स्लॅब कोसळला; १ ठार, ५ जखमीबचावपथक पुन्हा इमारतीत गेल्याने आणखी कितीजण अडकलेत याबाबत गर्दीमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली. ते पाहून अधिकाऱ्यांचीही घालमेल वाढली. मात्र, तब्बल दोनवेळा बचावपथकाने शोध घेऊन स्लॅबखाली कुणीच नसल्याचे सांगताच अधिकाऱ्यांसह गर्दीनेही आकाशाकडे पाहत हात जोडले.

माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनीही केली मदतघटना घडल्यानंतर या परिसरातील माजी नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यापासून ते बचावकार्यात अडथळा येऊ नये यासाठी प्रशासनाला मदत केली.

नातेवाईकांचा आक्रोशही घटना घडल्यानंतर नातेवाईकांचा आक्रोश पाहून अनेकजण हळहळले. कारण ज्या पद्धतीने स्लॅब कोसळला ते पाहता आणि झालेला आवाज ऐकल्यानंतर अनेकजण मलब्याखाली अडकले असल्याची भीती होती. सर्वच कामगार एकमेकांशी संबंधित आणि नातेवाईक असल्याने नातेवाईकांचा आक्रोश बघायला मिळाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Fire Station Slab Collapse: Fears of More Trapped Underneath

Web Summary : Kolhapur fire station slab collapsed, injuring five. Initial rescue efforts paused after a false alarm of another person trapped. Searches confirmed no further victims. Relatives of workers were distraught.