शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

वीस लाखांची फसवणूक, हुपरीतील राजेंद्र नेर्लेकर याच्यावर आणखी एक गुन्हा

By उद्धव गोडसे | Updated: April 2, 2024 13:30 IST

कोल्हापूर : जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणारा संशयित राजेंद्र भीमराव नेर्लेकर (रा. शिवाजीनगर, हुपरी, ता. ...

कोल्हापूर : जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणारा संशयित राजेंद्र भीमराव नेर्लेकर (रा. शिवाजीनगर, हुपरी, ता. हातकणंगले) याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. त्याने ताराबाई पार्क येथील वन प्लस सोल्युशन कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना गंडा घातला आहे. याबाबत प्रकाश केशव पाटील (वय ३४, रा. उत्तर तांबवे, ता. कराड, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली असून, त्यांच्यासह दोघांची २० लाखांची फसवणूक झाली.पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताराबाई पार्क येथील आदित्य कॉर्नर परिसरात वन प्लस सोल्युशन कंपनीचे कार्यालय सुरू होते. कंपनीचा प्रमुख राजेंद्र नेर्लेकर याने जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले. त्याच्या आमिषाला बळी पडून फिर्यादी प्रकाश पाटील यांनी जानेवारी २०२१ मध्ये १२ लाख रुपये भरले. परताव्यापोटी त्यांना ४ लाख १५ हजार रुपये मिळाले. मात्र, मार्च २०२२ नंतर परतावे बंद झाले आणि मुद्दलही अडकली. त्यांच्या मित्राचे ११ लाख ७० हजार रुपये कंपनीत अडकले. वारंवार मागणी करूनही पैसे परत मिळत नसल्याने त्यांनी अखेर शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. २० लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा पोलिसांनी संशयित नेर्लेकर याच्यावर दाखल केला. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस