वडगावात आज आणखी एक कोरोना पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:46 IST2021-03-13T04:46:44+5:302021-03-13T04:46:44+5:30
पेठवडगाव : येथील एका महाविद्यालयीन युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याच्या तिसऱ्यादिवशी शुक्रवारी आणखी एका युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या ...

वडगावात आज आणखी एक कोरोना पाॅझिटिव्ह
पेठवडगाव : येथील एका महाविद्यालयीन युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याच्या तिसऱ्यादिवशी शुक्रवारी आणखी एका युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या पार्श्वभूमीवर वडगाव पोलीस व पालिका प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्या २७२ दुचाकीस्वारांवर कारवाई केली.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सापडलेल्या 'त्या' युवकावर सीपीआर रुग्णालयात, तर आज कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या युवकावर कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी नवीन वसाहती, रामनगर येथे कोरोनाचे रुग्ण मिळून आले आहेत. नवीन वसाहतीतील चौघा नातेवाईकांचे अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत.
या पार्श्वभूमीवर पालिका व पोलीस प्रशासनाने विनामास्क दुचाकीस्वारांवर कारवाईचा बडगा उगारला. गुरुवारी १२०, तर आज १५२ जणांवर कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी रस्त्यावर येऊन ही कारवाई केली. हवालदार बाबासाहेब दुकाने, विशाल हुबाले, रणजितकांत वाघमारे, शिराज मुल्ला यांच्यासह पालिका कर्मचारी यांनी केली.
फोटो ओळ :
पेठवडगाव येथील पालिका चौकात पालिका व पोलीस प्रशासनच्यावतीने विनामास्क नागिरकावर कारवाई करताना पोलीस, पालिका कर्मचारी. (छाया : क्षितिज जाधव)