आणखी १२८५ विद्यार्थ्यांनी केली शाखा निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:24 IST2021-08-29T04:24:22+5:302021-08-29T04:24:22+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यात ऑनलाइन पद्धतीने सुरू असलेल्या ११ वी प्रवेशासाठी अर्ज करण्याच्या चौथ्या दिवशी शनिवारी आणखी १२८५ जणांनी शाखा ...

Another 1285 students did branch confirmation | आणखी १२८५ विद्यार्थ्यांनी केली शाखा निश्चित

आणखी १२८५ विद्यार्थ्यांनी केली शाखा निश्चित

कोल्हापूर : जिल्ह्यात ऑनलाइन पद्धतीने सुरू असलेल्या ११ वी प्रवेशासाठी अर्ज करण्याच्या चौथ्या दिवशी शनिवारी आणखी १२८५ जणांनी शाखा निश्चित केली. यात अपेक्षेप्रमाणे विज्ञान शाखेकडे सर्वाधिक कल राहिला आहे.

ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. बुधवारपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत आतापर्यंत ७ हजार ५५८ जणांनी शाखा निश्चित केली आहे. यात विज्ञानसाठी सर्वाधिक ४ हजार २५७ अर्ज आले आहेत. वाणिज्य, मराठी माध्यम १२६९ आणि वाणिज्य इंग्रजी माध्यम साठी ११८२ अर्ज आले आहेत. कला मराठी माध्यम ८०० आणि इंग्रजी माध्यमातून ५० जणांनी प्रवेशासाठी अर्ज केला आहे.

शनिवारी आलेल्या १२८५ अर्जांपैकी विज्ञान ७१८, कॉमर्स मराठी माध्यम २१७, इंग्रजी माध्यम १३६, कला मराठी माध्यम २०७, तर इंग्रजी माध्यमासाठी ७ अर्ज आले आहेत.

Web Title: Another 1285 students did branch confirmation