महालक्ष्मी भक्त मंडळाची वार्षिक सभा खेळीमेळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:16 IST2021-02-05T07:16:12+5:302021-02-05T07:16:12+5:30

कोल्हापूर : येथील श्री महालक्ष्मी भक्त मंडळ-धर्मशाळेची ६६ वी वार्षिक सभा धर्मशाळेच्या सभागृहात खेळीमेळीत पार पडली. संस्थेचे अध्यक्ष राजू ...

Annual meeting of Mahalakshmi Bhakt Mandal in full swing | महालक्ष्मी भक्त मंडळाची वार्षिक सभा खेळीमेळीत

महालक्ष्मी भक्त मंडळाची वार्षिक सभा खेळीमेळीत

कोल्हापूर : येथील श्री महालक्ष्मी भक्त मंडळ-धर्मशाळेची ६६ वी वार्षिक सभा धर्मशाळेच्या सभागृहात खेळीमेळीत पार पडली. संस्थेचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी कामकाजाचा आढावा घेतला.

यावेळी झालेल्या चर्चेत बाबा वाघापूरकर, विनोद डिग्रजकर, राजेश पाटील, महेश धर्माधिकारी, संतोष नेतलकर यांनी सहभाग घेतला. मेवेकरी यांनी सभासदांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे दिली. यावेळी विविध पदांवर नियुक्त झालेल्या सभासदांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच कोरोना काळात पोलीस दलातील कर्मचारी व गरजूंना जेवण पुरवल्याबद्दल राजू मेवेकरी व टीमचा सत्कार झाला. नंदकुमार मराठे यांनी अहवाल वाचन केेले. ज्येष्ठ संचालक एस. के. कुलकर्णी यांनी आभार मानले.

---

फोटो नं २५०१२०२१-कोल-महालक्ष्मी भक्त मंडळ

ओळ : श्री महालक्ष्मी भक्त मंडळ-धर्मशाळेची ६६ वी वार्षिक सभा धर्मशाळेच्या सभागृहात खेळीमेळीत पार पडली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी कामकाजाचा आढावा घेतला.

--

Web Title: Annual meeting of Mahalakshmi Bhakt Mandal in full swing