चौथी, सातवीचे वेळापत्रक जाहीर

By Admin | Updated: November 29, 2014 00:28 IST2014-11-29T00:24:00+5:302014-11-29T00:28:51+5:30

शिष्यवृत्ती परीक्षा : आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

Announcing the fourth, seventh edition | चौथी, सातवीचे वेळापत्रक जाहीर

चौथी, सातवीचे वेळापत्रक जाहीर

कोल्हापूर : इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे आॅनलाईन अर्ज, शुल्क भरण्याचे वेळापत्रक शिक्षण उपसंचालकांकडून जाहीर झाले आहे. आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
राज्य परीक्षा परिषदेच्या ६६६.े२ूीस्र४ल्ली.्रल्ल या संकेतस्थळावर शिष्यवृत्ती परीक्षेची माहिती, सूचना आणि वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. परिषदेकडून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळाल्यानंतर शाळेने सर्वप्रथम शाळा माहिती प्रपत्र भरणे आवश्यक आहे. लॉगीन आयडी व पासवर्ड मिळाला नसल्यास संकेतस्थळावरील विहीत नमुन्याप्रमाणे मुख्याध्यापकांनी अर्ज ई-मेलद्वारे परिषदेकडे पाठवावा. शाळा माहिती प्रपत्र भरून ते निश्चित केल्यानंतरच विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज भरता येणार आहेत.
आॅनलाईन चलनाची प्रिंट घेऊन बँकेत शुल्क भरल्यानंतर शाळेने चलन अपडेट करणे आवश्यक आहे. दरम्यान, आॅनलाईन अर्ज करणे, चलनाची प्रिंट घेणे, प्रत गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे जमा करण्याची अतिविलंब शुल्कासह मुदत २० डिसेंबर ते परीक्षेपूर्वी १५ दिवस आधीपर्यंत आहे. (प्रतिनिधी)

वेळापत्रक असे...
प्रक्रिया (कालावधी)नियमित शुल्कविलंब शुल्कासह
आॅनलाईन अर्ज करणे४ डिसेंबर५ डिसेंबर ते १९ डिसेंबर
बँकेत शुल्क भरणे५ डिसेंबर५ ते २० डिसेंबर
चलन अपडेट करणे८ डिसेंबर ५ ते २२ डिसेंबर
प्रमाणपत्रे, चलनाची
प्रत जमा करणे ९ डिसेंबर५ ते २३ डिसेंबर

Web Title: Announcing the fourth, seventh edition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.