कलाकारांना आर्थिक पॅकेज जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:24 IST2021-03-16T04:24:47+5:302021-03-16T04:24:47+5:30

कोरोनामुळे राज्यातील सर्व जत्रा, यात्रा, लग्नाचे कार्यक्रम बंद झाले आहेत. त्यामुळे कलाकार व मालक यांचे मोठे नुकसान झाले आहे. ...

Announce financial package to artists | कलाकारांना आर्थिक पॅकेज जाहीर करा

कलाकारांना आर्थिक पॅकेज जाहीर करा

कोरोनामुळे राज्यातील सर्व जत्रा, यात्रा, लग्नाचे कार्यक्रम बंद झाले आहेत. त्यामुळे कलाकार व मालक यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील कलाकारांना व मालकांना शासनाने आर्थिक पॅकेज जाहीर करून मदत करावी, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांना मंजुरी द्यावी, अशी मागणी कलाकार महासंघ राज्य संघटनेने पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली.

यावेळी जिल्हाध्यक्ष जयवंतराव वायदंडे, जिल्हा कार्याध्यक्ष राम कुंभार, संपर्कप्रमुख विकास साठे, कोषाध्यक्ष उदयराज पोवार, उपाध्यक्ष उमेश अवघडे, सदस्य सचिन गोसावी, महेश कदम, शोभा पाटील, सागर साठे, अनिल वागवेकर, सोनल डोईफोडे, विनोद हजारे, आसराप्पा कांबळे, आकाश सौंदडे, मधुकर कांबळे, संग्राम मांडरेकर, रवी साळवी, एम एस. कांबळे, अवधूत जाधव, रोहित कांबळे, लक्ष्मण चव्हाण, बाजीराव माने, अनिल पाटील उपस्थित होते.

फोटो १५ शिरोली कलाकार

ओळी

कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने पालकमंत्री सतेज पाटील यांना निवेदन देताना कलाकार व मालक.

Web Title: Announce financial package to artists