एएमओ’ इलेक्ट्रिक बाईक्सचा वर्धापन दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:25 IST2021-08-15T04:25:03+5:302021-08-15T04:25:03+5:30

कोल्हापूर : एएमओ इलेक्ट्रिक बाईक्स कंपनीने कल्पनाशक्ती व मूल्यांच्या जोरावर यशाच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. कंपनीने पहिल्या सहा ...

Anniversary of AMO's electric bikes | एएमओ’ इलेक्ट्रिक बाईक्सचा वर्धापन दिन

एएमओ’ इलेक्ट्रिक बाईक्सचा वर्धापन दिन

कोल्हापूर : एएमओ इलेक्ट्रिक बाईक्स कंपनीने कल्पनाशक्ती व मूल्यांच्या जोरावर यशाच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. कंपनीने पहिल्या सहा महिन्यांतच ३४३ टक्के रिटेल व २४० टक्के नेटवर्क वाढ झाली असून, आतापर्यंत चार मॉडेल जाटी, इस्पाइरर, फिएस्टी, स्पिन बाजारात आणले आहेत. भारतात इलेक्ट्रिक बाइक्सची मागणी वाढत आहे. ‘एएमओ’च्या तिसऱ्या वर्धापनदिनी संस्थापक सुशांत कुमार म्हणाले, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कंपनीची विक्री व विकास दरात वाढ झाली आहे. पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमती व पर्यावरण जागरुकतेमुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. कंपनीने वेगाने नवीन राज्यांमध्ये आपला विस्तार करण्यात यश मिळवले आहे. इलेक्ट्रिक बाईकच्या प्रात्यक्षिकासाठी एएमओ च्या केदार मोटर्स, उमा टॉकीज चौक पेट्रोल पंपासमोर कोल्हापूर येथे भेट द्या, असे आवाहन कुमार यांनी केले.

Web Title: Anniversary of AMO's electric bikes