...अन् लालपरी सजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:58 IST2020-12-05T04:58:37+5:302020-12-05T04:58:37+5:30
कळंबा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एस.टी. सेवा अधिकाधिक लोकाभिमुख व बळकट व्हावी, प्रवासी आकर्षित व्हावेत यासाठी कार्यरत महाराष्ट्र ...

...अन् लालपरी सजली
कळंबा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एस.टी. सेवा अधिकाधिक लोकाभिमुख व बळकट व्हावी, प्रवासी आकर्षित व्हावेत यासाठी कार्यरत महाराष्ट्र एस.टी.प्रेमी महासमूह व सार्वजनिक परिवहन अभ्यासकांच्या राज्यव्यापी संस्थेचा पहिला वर्धापनदिन संभाजीनगर बसस्थानकात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी एस.टी. सेवेकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलून जिव्हाळा निर्माण व्हावा, यासाठी एमएच ११ टी ९२७६ ही एस.टी. बस सजविण्यात आली. या एस.टी. बसची संपूर्ण रंगरंगोटी करून त्यावर आकर्षक बोधवाक्ये लिहिण्यात आली होती. वर्धापनदिनाचे औचित्य साधून जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी यंत्र अभियंता सुनील जाधव, संभाजीनगर बसस्थानक आगारप्रमुख उत्तम पाटील उपस्थित होते.
फोटो ०४ संभाजीनगर एसटी
महाराष्ट्र एस.टी.प्रेमी महासमूहाच्या वतीने वर्धापनदिनाचे औचित्य साधून कोल्हापुरातील संभाजीनगर बसस्थानकामधील एस.टी. बस रंगवून आकर्षक सजविण्यात आली होती.