शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: वारंवार पैसे मागते, घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून प्रेयसीचा केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 11:58 IST

पठाण हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याने यापूर्वीच स्वत:च्या पत्नीचा खून केला आहे

हातकणंगले : पैशाची वारंवार मागणी करते, दिलेले पैसे परत देत नाही म्हणून चिडलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या डोक्यात हातोडा घालून खून केल्याचा प्रकार अतिग्रे (ता. हातकणंगले ) येथील लॉजवर घडला. सुमन सुरेश सरगर (वय ३५, रा. उचगाव, ता. करवीर ) असे मृत महिलेचे नाव असून तिचा प्रियकर आदम गौस पठाण (वय ४५, रा. घुणकी) याने खून केल्याचे गुरुवारी रात्री ८ वाजता उघडकीस आले. हातकणंगले पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा रात्री उशिरा नोंद झाला असून पठाण याला अटक करण्यात आली आहे.अधिक माहिती अशी की, घुणकीचा रहिवासी असलेल्या आदम पठाण आणि सुमन सरगर यांची एका कार्यक्रमामध्ये ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. गेल्या सात वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. या दरम्यान सुमन हिने आदम याला सात लाख रुपये दिले होते. हे दिलेले पैसे सुमन आदमकडे वारंवार मागत होती.

या कटकटीला कंटाळलेल्या आदमने गुरुवारी सुमनला अतिग्रे येथील एका लॉजवर दुपारी १२ वाजता आणले. सायंकाळपर्यंत हे जोडपे बाहेर न आल्याने लॉजचालकाने संबंधित खोलीचा दरवाजा उघडून पाहिला असता सुमन रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. संशयित आरोपी आदम याने सुमन हिच्या डोक्यात हातोड्याचे तीन घाव घालून तिचा खून केला होता.आदम पठाण लॉजचा दरवाजा उघडताच पळून जात असताना लॉज मालक व कर्मचारी यांनी त्याला पकडून दुसऱ्या खोलीत कोंडून ठेवले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.गुन्हेगारी प्रवृत्तीआदम पठाण हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याने यापूर्वीच स्वत:च्या पत्नीचा खून केला आहे. त्याचा न्यायालयीन खटला सुरू आहे. लॉजच्या खोली मध्येच सुमन रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असताना निर्दयी आदम त्या खोलीत सुमारे चार तास गप्प बसून होता. यावरून त्याने नियोजन करून प्रेयसीचा काटा काढल्याचे झाल्याप्रकाराने स्पष्ट झाले आहे.