अंगणवाडी सेविका, मदतनिसांचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:04 IST2021-01-13T05:04:10+5:302021-01-13T05:04:10+5:30
इचलकरंजी : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विविध प्रश्नांबाबत कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर मंगळवारी दिवसभर ...

अंगणवाडी सेविका, मदतनिसांचे ठिय्या आंदोलन
इचलकरंजी : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विविध प्रश्नांबाबत कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर मंगळवारी दिवसभर ठिय्या आंदोलन केले. तसेच मागण्यांचे निवेदन प्रांत कार्यालयात दिले.
निवेदनात, अंगणवाडी सेविकांना कामगार हा दर्जा देऊन वेतनश्रेणी लागू करावी. तसेच इतर कामगारांप्रमाणे लाभ मिळावा. निवृत्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना एकरकमी लाभ मिळाला नाही. तो ताबडतोब त्यांच्या खात्यावर जमा करावा. केंद्र शासनाने केलेले नवे शिक्षण धोरण अंगणवाडी योजनेला पूरक नसल्याने ते महाराष्ट्रामध्ये लागू करू नये, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात राजकुमार गेजगे, संदीप भगत, राजेश पाटील, नंदा डांगरे, सरिता शिंगारे, सुजाता कुंभार, राखी मिणेकर, छाया कांबळे आदींचा समावेश होता.
(फोटो ओळी)
१२०१२०२१-आयसीएच-०४
इचलकरंजीत कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटनेने प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
(छाया-उत्तम पाटील)