शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: लाखो रुपयांची फसवणूक; हुपरीच्या राजेंद्र नेर्लेकरला आंध्र प्रदेश पोलिसांनी केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 11:52 IST

भावालाही घेतले ताब्यात

हुपरी (कोल्हापूर) : जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून विविध राज्यांतील शेकडो जणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेला हुपरी (ता. हातकणंगले) येथील राजेंद्र भीमराव नेर्लेकर व त्याचा भाऊ अनिल भीमराव नेर्लेकर यांना आंध्र प्रदेश पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. शेळी-मेंढीपालन व्यवसायाच्या माध्यमातून मोठा फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आंध्र प्रदेशात फसवणूक केल्याचा त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.विविध प्रकारचे उद्योग उभारणी करणे, शेळी-मेंढीपालन तसेच विविध प्रकारच्या करन्सीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा लाभ मिळवून देतो, अशी आमिषे दाखवून राजेंद्र नेर्लेकर याने मधाळ बोलण्याने देशभरातील शेकडो जणांना फसविले आहे. त्याच्या विरोधात अनेक राज्यांत गुन्हे दाखल आहेत.राजेंद्र नेर्लेकर याच्या मुलाचे सोमवारी नृसिंहवाडी येथे लग्न झाले. बुधवारी त्यांच्या घरी सत्यनारायण पूजन होते, त्यानिमित्त संत बाळूमामा पालखी आणण्यात आली होती. दारात मिष्टान्न जेवणाच्या पंगती उठवल्या जात होत्या. याचवेळी आंध्र प्रदेश पोलिसांनी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास राजेंद्र व त्याचा भाऊ अनिल याला ताब्यात घेऊन अटक केली.नेर्लेकर याने निमित्तसागर महाराजांसारख्या तपस्वीलाही सोडले नसून त्यांची सुमारे ३५० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. ही रक्कम परत मिळावी, यासाठी महाराजांनी त्याच्या दारातच उपोषण सुरू केले होते.

लोकमतने फोडली वाचा..राजेंद्र नेर्लेकर याच्या फसवणूक प्रकरणाचा लोकमतने १८ डिसेंबरच्या अंकात सर्वप्रथम पर्दाफाश केला. त्यामुळे त्याच्या फसवणूक प्रकरणाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली. अनेकांनी लोकमतचे अभिनंदनही केले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस