..अन् मंत्री मुश्रीफांना आवरला नाही लाठीकाठी फिरवण्याचा मोह
By सचिन भोसले | Updated: October 20, 2023 14:23 IST2023-10-20T14:21:49+5:302023-10-20T14:23:51+5:30
कोल्हापूर : शाही दसरा कोल्हापूरचा महोत्सवाअंतर्गत राज्यस्तरीय मर्दानी खेळ स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शस्त्र पूजनाने ...

..अन् मंत्री मुश्रीफांना आवरला नाही लाठीकाठी फिरवण्याचा मोह
कोल्हापूर : शाही दसरा कोल्हापूरचा महोत्सवाअंतर्गत राज्यस्तरीय मर्दानी खेळ स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शस्त्र पूजनाने झाले. यावेळी सहभागी झालेल्या एका संघाच्या स्पर्धकाने लाठीकाठी फिरवून उपस्थितांची मने जिंकली. हे पाहून पालकमंत्री मुश्रीफ यांनाही लाठीकाठी फिरवण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनीही लाठीकाठी फिरवून आनंद लुटला.
छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर शुक्रवारी सकाळी आठ वाजता पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते व प्राचीन युद्धकला मर्दानी खेळाचा आखाड्याचे ज्येष्ठ वस्तादांच्या उपस्थितीत झाले. मोठ्या उत्साहात व थरारक प्रात्यक्षिके सादर करून स्पर्धकांनी उपस्थितांच्या डोळ्याची पारणे फेडली.
उद्घाटनानंतर एका स्पर्धकाने पालकमंत्री मूश्रीफ यांच्यासमोरच लाठीकाठीची थरारक प्रात्यक्षिके सादर करीत उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेतला. अशा भारावलेल्या वातावरणात मुश्रीफ यांनाही लाठीकाठी फिरवण्याचा मोह काही आवरता आला नाही. त्यांनीही लाठीकाठी घेवून फिरवली आणि खेळाचा आनंद लुटला.