शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

...अन् मुश्रीफ यांनाही आलं गहिवरून; म्हाकवेतील 'त्या' तरुणाच्या कुटुंबीयांना लाखाची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 17:25 IST

Kolhapur : दोन दिवसांपूर्वी येथे ओढ्यातून वाहून गेलेल्या सचिन जयराम पाटील (वय ३०) याचा आज सकाळी ऊसाच्या शेतात मृतदेह आढळून आला.

- दत्ता पाटील

म्हाकवेः पुरात वाहून गेलेल्या म्हाकवे(ता.कागल) येथील सचिन जयराम पाटील या तरुणाच्या कुटुंबीयांचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट देऊन सांत्वन केले. तो नोकरीत असलेल्या रेमंड कंपनीसह, शेतकरी अपघात विमा, केडीसीसी बँकेची सभासद अपघात विमा यासह मुश्रीफ फाऊंडेशनच्या वतीने एक लाख रुपये तातडीची मदत जाहीर केली. तसेच सचिन यांची मुलगी शिवन्याच्या उच्च शिक्षणापर्यंतची जबाबदारीही मंत्री मुश्रीफ यांनी स्वीकारत मदतीचा हात पुढे केला.

दोन दिवसांपूर्वी येथे ओढ्यातून वाहून गेलेल्या सचिन जयराम पाटील (वय ३०) याचा आज सकाळी ऊसाच्या शेतात मृतदेह आढळून आला. तो कागल पंचतारांकित वसाहतीतील रेमंड कंपनीत कायम स्वरुपी नोकरीला होता.कर्त्या युवकांचा दुदैवी मृत्यू झाल्याने या कुटुंबीयांवर संकट ओढविल्याने हे कुटुंब उघड्यावर पडू नये यासाठी मुश्रीफ यांनी तात्काळ या कुंटुंबाला मदतीचे हात पुढे केले.

यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुनिल संसारे,बिद्री'चे संचालक प्रविणसिंह भोसले,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवानंद माळी,माजी प स सदस्य ए.वाय.पाटील,सरपंच सौ.सुनिता चौगुले,उपसरपंच धनंजय पाटील,रमेश पाटील,सिद्राम गंगाधरे,हिंदुराव पाटील, आकाराम पाटील,डॉ.विजय चौगुले,दिनेश पाटील,रघुनाथ पाटील,जीवन कांबळे,सिताराम गोरे,अमित पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, येथील पुरपरिस्थीतीची पाहणी करून हसन मुश्रीफ फाऊंडेशनच्यावतीने पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

अन् मुश्रीफ यांनाही आले गहिवरून..."१५ वर्षापूर्वीच मातृ- पितृ छत्र हरविलेल्या सचिनवर कुटुंबीयांची जबाबदारी होती. मोठ्या परिश्रमातून हे कुटुंब सावरत होते. तोच कर्त्या सचिनवर काळाने घाला घातला. म्हाकवे-गोरंबे रस्त्यावर असणाऱ्या या कुटुंबीयांच्या घरी मुश्रीफ जाताच कुटुंबीयांनी चिमुकल्या शिवन्याचे काय होणार? असे म्हणत हंबरडा फोडला. यावेळी मुश्रीफ यांनी कुटुंबीयाला धीर देत शिवन्याच्या उच्च शिक्षणापर्यंतची जबाबदारी व एक लाख रुपयेही शिवन्याच्या नावे ठेवणार असल्याची घोषणा केली. तसेच, केडीसीसी बँकेसह रेमंड कंपनी व शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKolhapur Floodकोल्हापूर पूरHasan Mushrifहसन मुश्रीफ