शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शिवनाकवाडीतील विषबाधा, वृद्धाचा मृत्यू; अहवालाची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 12:40 IST

कुरुंदवाड : शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथे यात्रेदरम्यान अन्नातून विषबाधा होऊन उपचार सुरू असताना सीपीआर रुग्णालयात वृद्धाचा मंगळवारी (दि. ११) ...

कुरुंदवाड : शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथे यात्रेदरम्यान अन्नातून विषबाधा होऊन उपचार सुरू असताना सीपीआर रुग्णालयात वृद्धाचा मंगळवारी (दि. ११) मृत्यू झाला. बाळासो सदू आरगे (६२) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, मृत आरगे यांना मधुमेह, थायरॉईड, किडनीचा विकार होता. या आजारातून त्यांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.गत आठवड्यात गावच्या कल्याणताई देवीच्या यात्रेत महाप्रसादातून ७०० हून अधिक जणांना विषबाधा झाली होती. आरोग्य विभागाने गावात उपचार केंद्र सुरू केले होते. गंभीर रुग्णांवर इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात, तसेच काहीजण खासगी रुग्णालयात उपचार घेत होते.बहुतेक सर्वच रुग्ण उपचार घेऊन डिस्चार्ज घेतल्याने आरोग्य विभागाने सुटकेचा नि:श्वास टाकला होता. मात्र, विषबाधा झाल्याने उपचारांसाठी दाखल करण्यात आलेले आरगे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.अन्नाच्या अहवालाची प्रतीक्षाअन्नातून विषबाधा झाल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने घटनेनंतर महाप्रसादातील खीर व पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले होते. खिरीचा अहवाल आला नसला तरी पिण्याच्या पाण्याचा तपासणी अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून, पाण्यात दोष नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे खिरीचा अहवाल काय येतो याचीच प्रतीक्षा लागून राहिली आहे.

मृत बाळासो आरगे यांना विषबाधा झाली असली तरी त्यांना मधुमेह, किडनी, थायरॉईडचा विकार होता. ७२ तासांनंतर विषबाधा विषय संपलेला असतो. त्यामुळे आरगे यांचा त्यांच्या इतर आजारामुळेच मृत्यू झाला आहे. - डॉ. पांडुरंग खटावकर, तालुका वैद्यकीय अधिकारी, शिरोळ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfood poisoningअन्नातून विषबाधाDeathमृत्यू