शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात मतदानाच्या रांगेतच वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू, कार्यकर्त्यांची तारांबळ

By उद्धव गोडसे | Updated: May 7, 2024 13:37 IST

भुये येथे दुचाकीवरून पडून वृद्धा जखमी

कोल्हापूर : उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत मतदान केंद्रावर मतदानासाठी गेलेले महादेव श्रीपती सुतार (वय ६९, रा. उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर) हे रांगेतच चक्कर येऊन कोसळले. नातेवाईकांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे मतदान केंद्राच्या परिसरात काही काळ कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली.याबाबत अधिक माहिती अशी की, महादेव सुतार हे मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास मतदानासाठी घरातून बाहेर पडले. जवळच असलेल्या रमाबाई आंबेडकर शाळेतील केंद्रावर त्यांचे मतदान होते. मतदानासाठी रांगेत उभे असतानाच चक्कर येऊन ते कोसळले. हा प्रकार लक्षात येताच सोबत असलेल्या नातेवाईकांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला.

मतदान केंद्रावरील राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि नातेवाईकांनी सुतार यांना तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.दुचाकीवरून पडून वृद्धा जखमीभुये (ता. करवीर) येथे मतदान करून मुलाच्या दुचाकीवरून बालिंगे पाडळी (ता. करवीर) येथे परत जाताना तोल जाऊन पडल्याने वृद्धा जखमी झाली. कमल विलास पोवार (वय ६०, मूळ रा. भुये, सध्या रा. बालिंगे पाडळी) असे जखमीचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (दि. ७) सकाळी अकराच्या सुमारास कांचनवाडी (ता. करवीर) येथे घडली. जखमी कमल यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४VotingमतदानDeathमृत्यू