शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, कोल्हापुरातील अमोल पोवारला जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 13:05 IST

आजरा तालुक्यात झाला होता खून

कोल्हापूर : विम्याची रक्कम हडप करण्यासाठी मजुराचा खून करून स्वत:चा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करणारा बांधकाम व्यावसायिक अमोल जयवंत पोवार (वय ४०, रा. साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर) याला गडहिंग्लज न्यायालयातील जिल्हा व सत्र न्यायाधीश ओ. आर. देशमुख यांनी दोषी ठरविले. त्याला जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. त्याचा भाऊ विनायक जयवंत पोवार (४४) याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली. मार्च २०१६ मध्ये आजरा तालुक्यातील वेळवट्टीजवळ झालेल्या खून खटल्याचा निकाल सोमवारी लागला.बांधकाम व्यावसायिक अमोल पोवार याच्यावर सुमारे ५ कोटी रुपयांचे कर्ज होते. कर्ज फेडण्यासाठी त्याने स्वत:च्या अपघाती मृत्यूचा बनाव केला. अपघात विम्याची ३५ कोटींची रक्कम हडप करता यावी यासाठी त्याने भाऊ विनायक पोवार याची मदत घेऊन मार्च २०१६ मध्ये गडहिंग्लज येथून मजूर रमेश कृष्णा नायक (वय १९, रा. कडगाव, ता. गडहिंग्लज, मूळ रा. नागबेनाळ, ता. मुद्देबिहाळ, जि. विजापूर, कर्नाटक) याला काम देण्याचे आमिष दाखवून कारमध्ये घेतले.दारू पाजून त्याला आजऱ्याच्या दिशेने घेऊन गेले. कारमध्ये दोरीने गळा आवळून त्याचा खून केला. अमोल पोवार यांची कपडे त्याला घातले. त्याचे घड्याळही मजुराच्या हातात घातले. त्यानंतर वेळवट्टी येथील लक्ष्मी ओढ्यात कार ढकलून डिझेल टाकून पेटवून दिली. स्वत:च्या अपघाती मृत्यूचा बनाव करून अमोल पोवार केरळमधील कोची येथे जाऊन लपला होता.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन निरीक्षक दिनकर मोहिते आणि आजरा पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा करून दोन्ही आरोपींना अटक केली. सरकारी वकील एच. आर. एस. भोसले आणि सुनील तेली यांनी न्यायालयात ७१ साक्षीदार तपासले. यातील ३० जण फितूर झाले. साक्षीदारांच्या साक्षी, उपलब्ध पुरावे आणि वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश देशमुख यांनी आरोपी अमोल पोवार याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याचा भाऊ विनायक पोवार याची मात्र सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली.पोवारचा अनेकांना गंडाअमोल पोवार याने बांधकाम व्यवसायातून अनेकांना गंडा घातला होता. यात काही खासगी सावकारांचाही समावेश होता. विमा कंपनीसही गंडा घालण्याचा कट त्याने रचला होता. ३५ कोटींची विम्याची रक्कम हडप करण्यासाठी त्याने आधी एक कोटी रुपये भरून विमा उतरवला. त्यानंतर मजुराचा खून करून स्वत:च्या अपघाती मृत्यूचा बनाव केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस